🌟परभणी येथील नवा मोंढा पोलिस स्थानकात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गो सेवकांची बैठक संपन्न.....!


🌟परभणी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर डंबाळे यांनी सर्व गोसेवकांना केले मार्गदर्शन🌟 

परभणी :- परभणी शहर पोलिस प्रशासनाच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दि.१५ जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास शहरातील नवा पोलिस स्थानकात सर्व गो सेवक व गो रक्षक व सर्व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली.

या प्रसंगी परभणी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर डंबाळे यांनी सर्व गोसेवकांना मार्गदर्शन केले व सर्वांना सांगितले की काही जिथे कुठे गोमाता व नंदी बैल यांचा बचाव करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधावा किंवा पोलीस प्रशासनाचा फोन नंबर लावून किंवा जवळपासच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधून त्या त्या विभागाकडे कळवावे असे याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सर्व गोसेवक प्रतिनिधी ज्येष्ठ गोसेवक शिव प्रसाद कोरे राष्ट्रीयगोसेवक नितीन जाधव गोगलगावकर अरुण पवार सचिन रसाळ शंकर देशमुख शिंदे आधी  बहुसंख्य गोसेवक गोरक्षक व गोमाता प्रेमी प्राणीमित्र परभणी शहर उपस्थित होते.....🐄🐄🐄🐄🐄🐄

टीप पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधावा.   📞112

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या