🌟आत्मा अंतर्गत आयोजित शेती शाळांना महिलांचा भरभरून प्रतिसाद....!


🌟मौ.संबर येथे खरीप हंगाम टोकन सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेती शाळा वर्ग पहिला घेण्यात आला🌟


परभणी :- दिनांक 4 जून 2024 रोजी प्रकल्प संचालक आत्मा परभणी, दौलत चव्हाण उपप्रकल्प संचालक आत्मा परभणी,संजय गायकवाड तालुका कृषी अधिकारी परभणी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, स्वाती घोडके यांनी मौजे. संबर तालुका जिल्हा परभणी येथे खरीप हंगाम  टोकन सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेती शाळा वर्ग पहिला घेण्यात आला,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस  वंदन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वाती घोडके यांनी केशर आंब्याचे रोप देऊन मान्यवरांचे स्वागत केले,हा खूप महत्त्वाचा संदेश सर्व बंधू आणि भगिनींसाठी आहे, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपण इतरांना देतो पण याची सुरुवात स्वतःपासून करा,असा संदेश स्वाती घोडके यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून  दिला आहे,या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून  लाभलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील मृदशास्त्रज्ञ डॉ. पपीता गोरखेडे यांनी महिला शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व मातीचे नमुने कसे घ्यायचे आणि जमिनीची मशागत बियाणे निवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच स्वाती घोडके यांनी सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिक आणि बीज प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या शेती शाळेमध्ये सहा वर्गात महिला शेतकऱ्यांना जमिनीची मशागतीपासून तर सोयाबीन साठवणुकीपर्यंत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे,विशेष म्हणजे ही शेती शाळा फक्त महिला शेतकऱ्यांची आहे,आत्मा अंतर्गत स्थापन असलेल्या गटातील महिलांच्या या शेती शाळेला महिला शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे,आणि ही शेती शाळा महिलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरत आहे कारण शेतीमध्ये 80 टक्के काम करणाऱ्या या महिलाच आहेत,हा कार्यक्रम यशस्वीरितेसाठी विक्रम चव्हाण, आसामती चव्हाण,मनिषा पवार,सविता बोबडे,संगीता चव्हाण आणि आत्मा गटातील सर्व महिला उपस्थित होत्या अशाप्रकारे ही शेती शाळा यशस्वीरित्या पार पडली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या