🌟पुर्णा तालुक्यातील मौ.सुहागन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न....!


🌟गावातील विद्यार्थ्यांसह आई वडिलाचा जनस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव🌟

पुर्णा (दि.१० मे २०२४) - पुर्णा तालुक्यातील मौ.सुहागण येथे जनस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यात १० वी मध्ये ८०% टक्के पेक्षा जास्त व १२ वीत ७५ पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सुहागन गावातील विद्यार्थ्यांचा व त्यांच्या आई वडिलाचा जनस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे उपस्थित होते. तसेच सहायक पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे, बालभारतीचे सदस्य डॉ. राजेश पावडे, मुख्याध्यापक साईनाथ रामोड, शिक्षक गंगाधर लोखंडे, गावच्या सरपंच रूक्मिणीबाई पांचाळ तसेच जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिराजी भोसले यांनी भूषविले. विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडीलांच्या कष्टाचा विचार करून अभ्यास करावा व सुहागन गावाप्रमाणे गावागावातील शाळा सुधारल्या पाहिजेत असे मत शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे यांनी व्यक्त केले तर पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे विशेष द्यावे असे प्रतिपादन जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष हिराजी भोसले यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साखरे यांनी केले तर आभार पी एस आय ज्ञानेश्वर भोसले यांनी मानले. 

         कार्यक्रमाला छत्रपती संभाजी विद्यालयाचे उपाध्यक्ष बळीरामजी भोसले, माजी सैनिक रामचंद्र भोसले, माजी सरपंच कोंडीबा भोसले,  पुरभाजी भोसले, गणेशराव भोसले, विठ्ठलराव भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथराव भोसले, नारायण भोसले, शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भोसले, चेअरमन सुभाष भोसले, व्हाईस चेअरमन राघोजी भोसले, ग्रामपंचायत पंचायत सदस्य माऊली भोसले, बालाजी भोसले, उध्दव भोसले, गावातील सर्व शिक्षक कर्मचारी -अधिकारी वर्ग, महिला प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या