🌟सिख सिकलीगर समाज बांधवांचा जत्था पवित्र तिर्थक्षेत्र श्री हेमकुंड साहीब यात्रेसाठी रवाना.....!


🌟सिख सिकलीगर सोसायटीचे अध्यक्ष बलजीतसिंह बावरी यांच्या नेतृत्वाखालील तिर्थयात्री घेणार अनेक पवित्र तिर्थक्षेत्रांचे दर्शन🌟


 
नांदेड (दि.२० जुन २०२४) - हुजुर साहीब नांदेड येथील सिख सिकलकरी समाज बांधवांचा जत्था सिख सिकलीगर सोसायटीचे अध्यक्ष बलजीतसिंह बावरी यांच्या नेतृत्वाखाली पवित्र तिर्थक्षेत्र श्री हेमकुंड साहीबसह पवित्र तिर्थक्षेत्र मणिकरण साहिब पवित्र तख्त केशगड़ साहीब पवित्र तख्त आनंदपुर,साहिब पवित्र तख्त अमृतसर दरबार साहिब यात्रेसाठी दि.१७ जुन २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास रवाना झाला असून सिख सिकलीगर समाजासह संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी सदरील जत्था नमूद पवित्र धार्मिक तिर्थक्षेत्रा दरम्यान अरदास करणार आहे.

सदरील तिरयात्रूंचा जत्था आज गुरुवार दि.२० जुन रोजी पवित्र तिर्थक्षेत्र हेमकुंड साहिबच्या जवळपास पोहोचला असून आज येथील पवित्र गुरुद्वारात दर्शन घेतल्यानंतर पुढील यात्रेसाठी रवाना होणार असून या सिख सिकलीगर जत्थ्यामध्ये सिख सिकलीगर सोसायटीचे अध्यक्ष स.बलजीतसिंघ बावरी यांच्यासह जेष्ठ सामाजिक नेतृत्व स.ठाकुरसिंह बावरी बाळापुर,स.शेरसिंह बावरी नांदेड़,स.बाबूसिंह टांक कलमनुरी,स.अजीतसिंह जुनी परतूर,स.पापासिंह जुनी नांदेड़,बलबीरसिंह जुनी परभणी,रगबीरसिंह टांक परभणी,किरणसिंह टांक वसमत आदी मान्यवरांचा समावेश आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या