🌟'प्रयास इंडिया चॅरिटी फाउंडेशन' च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संजय कुमार कोटेचा यांची निवड.....!


🌟संजयकुमार कोटेचा यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟

ग्वाल्हेर  - संपूर्ण भारत देशामध्ये  ' दिव्यांग ' व्यक्तिंची जीवन वाहिनी बनलेल्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यरत,' प्रयास इंडिया चॅरिटी फाउंडेशन ' च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी, सामाजिक धार्मिक व पत्रकारितेच्या क्षेत्रामधील अग्रणी ,सदैव कार्यतत्पर असणारे ज्येष्ठ समाजसेवक ,पत्रकार संजय कुमार कोटेचा यांची निवड करण्यात आली आहे 

 'दिव्यांगा ' च्या जीवनातील समस्या, त्यांच्या आर्थिक व्यवस्थेअभावी होणारी ससेहोलपट थांबवून ,त्यांच्या जीवनात आनंद व बहार आणण्याचे कार्य , प्रयास चॅरिटी फाउंडेशन ही संस्था करत असते, या कार्यात सहभागी होण्याकरिता संजय कुमार कोटेचा यांच्या समाजउपयोगी विविध कार्याची दखल घेऊन संस्थेने , महाराष्ट्र अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र दि.२८ जून २०२४ रोजी दिले आहे, समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले ,मनमिळाऊ स्वभावाचे संजयकुमार कोटेचा यांनी देशभरामधील वृत्तपत्राचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्यास सुरू केलेल्या कार्यापासून विविध संघटना व धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आता राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रातील संघटनात्मक कार्यावर त्यांचा भर आहे , सर्वत्र त्यांचा नाव लौकीक वाढलेला आहे.

देश पातळीवरील पत्रकारांचे मोठे संघटन असलेल्या ,इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापासून कार्यरत राहुन आता ते राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत शिवाय महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या ' महिला उन्नती संस्था भारत  ' या राष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी पद तसेच भारत सरकारच्या संरक्षण विषयक बाबींमध्ये सहायता तसेच सामाजिक सलोखा नांदण्यासाठी मदत करणाऱ्या महत्त्वाच्या , ' क्लु इंटेलिजन्स जासूस खुपिया विभाग ' चे महाराष्ट्र व कर्नाटकचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत . 

संजयकुमार कोटेचा यांच्या सेवाभावी वृतीची व  गरजुवंत, संकटामध्ये सापडलेल्याना ,आर्थिक विवंचनाग्रस्तांना नेहमी मदतीचा हात देत ,राष्ट्रहितासाठी सदैव जागरूक असलेले संजय कुमार कोटेच्या दिव्यांगासाठी निश्चितच भरीव कार्य करतील या उद्देशाने प्रयास चारिटी फाउंडेशनने त्यांचे वर महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे ,ते ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडतील याची खात्री आहे. वरील नवनिर्वाचित निवडबद्दल संजयकुमार कोटेचा यांचे इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,ज्येष्ठ पत्रकार मदन (बापू )कोल्हे, महिला उन्नती संस्था (भारत)च्या महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्षा श्रीदेवी पाटील ,इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव संतोष शिंदे, महाराष्ट्र उपाध्यक्षा जाहिदा जमादार ,क्ल्यु इंटेलिजन्स चे महावीर दोशी, जिल्हा अध्यक्ष राजकुमार डोंबे ,यांच्यासह महाराष्ट्रातील  'इरा 'परिवार ,महिला उन्नती संस्था व क्ल्यू इंटेलिजन्स जासूस विभागाचे सर्व पदाधिकारी तसेच मराठवाडा विभाग अध्यक्ष राजकुमार एंगडे,मराठवाडा पि.आर.ओ. तथा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे, परभणी जिल्हाध्यक्ष मेहमूद पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष दि.फ.लोंढे, हिंगोली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, परभणी जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अमोल गौतम सर, प्रा. विद्यासागर साळवे, पुर्णा ता.अध्यक्ष विजय बगाटे, गंगाखेड ता.अध्यक्ष राजेश कांबळे ,परभणी ता. अध्यक्ष अब्दुल रहीम ,सा.विठोबा चे कार्यकारी संपादक प्रवीण मोरे आदींनी अभिनंदन केले असून संजयकुमार कोटेचा यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या