🌟परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खा.संजय जाधव यांची लोकसभेवर विजयाची हॅट्रीक....!


🌟राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा दारुण पराभव : अन्य उमेदवारांचे डिपॉझिट जप्त🌟


परभणी (दि.०४ जुन २०२४) : परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा अंतिम फेरीअखेर ०१ लाख ४० हजार ८९० एवढ्या मोठ्या फरकाने पराभव करीत लोकसभेवर विजयाची हॅट्रीक केली. 

            वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवार दि.०४ जुन २०२४ रोजी मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली निवडणूक अधिकार्‍यांनी सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी केली. त्यात जाधव यांनी सुमारे 3 हजारांवर मतांची आघाडी घेतली. त्या पाठोपाठ विधानसभा निहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीतच जाधव यांनी आघाडी घेतली. पाचवी आणि सहावी फेरी अपवाद अंतीम फेरीपर्यंत जाधव यांनी मताधिक्य कायम राखले. रात्री उशीरापर्यंत म्हणजे सव्वा अकरा पर्यंत मतमोजणीच्या चाललेल्या अंतीम फेरीनंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी अंतीम निकाल जाहीर केला त्यात संजय जाधव यांनी ०५ लाख ७३ हजार ४२९ एवढ्या मोठ्या मताधिक्याची आघाडी घेवून लोकसभेवर विजयाची हॅट्रीक केली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महादेव जानकर यांना ०४ लाख ३२ हजार ५३९ एवढी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डख यांना ९१ हजार ६०९, डॉ. गोवर्धन खंडागळे यांना १४ हजार ६५०,अपक्ष उमेदवार शिवाजी कांबळे यांना ११ हजार ६० व समीर दुधगांवकर यांना ११ हजार ५६ एवढी मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे आलमगीर खान यांना ११ हजार ६२ एवढी मते मिळाली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या