🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते फवारणी ड्रोनचे उद्घाटन......!


🌟यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून क्लस्टर सिताफळ लागवडीची देखील पाहणी🌟


परभणी : अजंता सेल्फ रिलायन्ट फार्मर प्रोडूसर कंपनी गंगाखेड यांनी इफको कंपनीसोबत करारनामा करून फवारणीकरिता ड्रोन उपलब्ध करून दिले असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते त्याचे काल शनिवार दि.२९ जुन २०२४ रोजी अनावरण करण्यात आले. 


यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, तंत्र अधिकारी एस. बी. पाटील, गजानन एडके,  नरेंद्र ठाकरे आदि उपस्थित होते अजंता सेल्फ रिलायन्ट फार्मर प्रोडूसर कंपनी गंगाखेड त्यांच्या संचालकाने पी बी सी एस ऍग्रो हब पुणे या संस्थेमधून अठरा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, हे ड्रोन यंत्र हे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना अल्प दरात उपलब्ध करून देणार आहेत, याबाबत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सविस्तर चर्चा करून नवतंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतक-यांना प्रोत्साहित केले यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो, तहसीलदार गंगाखेड जिल्हा जलसंधारण अधिकारी,तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाचे टीम उपस्थित होती.

* जिल्हाधिकाऱ्यांकडून क्लस्टर सिताफळ लागवडीची पाहणी :-


गंगाखेड तालुक्यातील मौजे खोकलेवाडी येथील पोकरा अंतर्गत झालेल्या सिताफळ फळबागेची आज मा. जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी फळबागेचे क्लस्टरमध्ये (30 एकर) लागवड झालेली पाहून समाधान व्यक्त केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या