🌟भारतीय डॉक्टर दिन : डॉ.बिधानचंद्र रॉय जयंती व स्मृतिदिन सप्ताह......!


🌟डॉक्टर दिनाचे मानकरी : डॉ.बिधानचंद्र रॉय🌟

डॉ.बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे या उद्देशाने भारत सरकारने सन १९९१मध्ये डॉक्टर दिन साजरा करण्यासंदर्भातील निर्णय घेतला. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थापनेत डॉ.बिधानचंद्र रॉय यांनी  महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या देशाच्या प्रगतीमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी- त्यांच्या कार्याचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे समण्याचा एक काळ होता. मात्र आता व्यवसायविश्वात डॉक्टर व रुग्ण यांच्यातही व्यावहारिक नाते उदयास येऊ लागले आहेत. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाही हळुहळू संपुष्टात येत आहे. यात समाजव्यवस्थेचाच दोष म्हणावा की काय? वैद्यकीय व्यवसाय केवळ डॉक्टरांच्या हातात न राहता औषध उत्पादक कंपन्या, विविध तपासण्या करणार्‍या लॅब व विमा कंपन्या आदींच्या कब्जात गेल्याने वैद्यकीय व्यवसाय एका दुष्टचक्रात अडकू पाहतोय. याविषयी श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींच्या शब्दांत वाचा रोचक माहिती... संपादक.   

    दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. राष्ट्रीय सेवेसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. जगातील विविध देशांकडून डॉक्टरांचा दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारतातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ.बिधानचंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त भारतात दरवर्षी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी निःस्वार्थपणे आपल्याला मदत केली आणि रूग्णाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले, अशा सर्व डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेबांनी मागे एकदा आपल्या मन की बात या कार्यक्रमात डॉ.बिधानचंद्र रॉय यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. डॉक्टर्स दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांविषयी बोलताना ते म्हणाले होते, ”१ जुलै रोजी आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू. ज्या डॉक्टरांनी कोविड-१९ने उद्भवलेल्या आव्हानापुढे भारताला हार मानू दिली नाही, त्या डॉक्टरांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे.”

    डॉ.रॉय यांचा जन्म १८८२मध्ये ब्रिटिश राजवटीच्या कालावधील भारताच्या पटणा बंगाल प्रेसीडेंसी येथे झाला. गणितातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठात औषधांसंदर्भातील शिक्षण घेतले. पुढील औषधांसंदर्भातील उच्च शिक्षणाच्या महत्वाकांक्षेने ते परदेशात गेले. लंडनमधील प्रतिष्ठित सेंट बार्थोलोमेझ हॉस्पिटलमध्ये त्यांना अभ्यास करायचा होता. परंतु ते आशियाई खंडातील असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला गेला. तरीसुद्धा त्यांनी हार न मानता सतत ३० दिवस प्रयत्न केल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला. कोलकाता मधील सन्मानित चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ.बिधानचंद्र रॉय यांचा जन्म १८८२मध्ये आणि निधन १९६२मध्ये १ जुलै रोजीच झाले होते. त्यामुळे त्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी- १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. ब्रिटिश भारतात जन्मलेले डॉ.बिधानचंद्र रॉय हे पटना बंगाल प्रेसिडेंट, चिकित्सक, एक स्वातंत्र्य सेनानी, एक शिक्षणतज्ज्ञ आणि एक राजनीतिज्ञ होते. देशाच्या प्रति त्यांचे समर्पण व सेवाभाव पाहता सन १९९१मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान त्यांनी सन १९४८ ते १९६२ दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळली. काउंसिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे  प्रत्येक १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा होऊ लागला आहे. या दिवशी देशातील डॉक्टरांच्या कार्याचे आभार मानले जातात. डॉक्टर दिन हा केवळ भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्येही साजरा केला जातो. अमेरिकेत हा दिवस ३० मार्च रोजी, क्यूबामध्ये ३ डिसेंबर रोजी तर इराणमध्ये २३ ऑगस्ट रोजी तो साजरा होत असतो. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात मार्च १९३३मध्ये प्रथमच डॉक्टर दिन साजरा करण्यात आला होता. हा दिवस डॉक्टरांना कार्ड पाठवून आणि निधन झालेल्या डॉक्टरांच्या कबरीवर फुले ठेवून साजरा करण्यात आला होता.

     वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांचे योगदान सध्याच्या परिस्थितीत फार मोठे आहे. तर काही ठिकाणी डॉक्टरांकडून फ्री मेडिकल कॅम्प भरवले जातात. तर एखाद्या आजारबद्दल ते मोफत उपचारासह जनजागृती करत असतात. सद्याचे कोरोनाचे महासंकट पाहता प्रत्येकाच्या मनात याबद्दल भीती निर्माण झाली आहे. तर कोरोनाच्या काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु तरीही कोरोनाच्या विरोधातील लढाई अद्याप सुरुच आहे. त्याचसोबत देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी अहोरात्र रुग्णांची सेवा करताना दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला रुग्णालयात जाऊन अधिक गंभीर प्रकृती निर्माण होईल अशी भीती बाळणारे काहीजण घरीच आयसोलेशनमध्ये राहणे पसंद करत आहेत. पण डॉक्टरांकडून त्यांना नेहमीच सहकार्य केले जात आहे. त्यामुळे लोकांना एक गोष्ट स्पष्टपणे कळली आहे, की डॉक्टरांचे आयुष्य हे किती जोखिमेचे असते. संक्रमित रुग्णाला बरे करून घरी पाठवण्यासाठी ते त्यांची सेवा करण्यात व्यस्त असतात. पण रुग्णांची सेवा करताना कोरोना झाल्याने काही डॉक्टरांनी सुद्धा आपला जीव गमावला आहे. त्यामुळे यंदाच्या डॉक्टर्स डे दिनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासह त्यांच्या कामाचे कौतुक केल्यास त्यांना आनंद होईल आणि रुग्णसेवा करण्यास प्रोत्साहन मिळेल, यात तिळमात्रही शंका नाहीच!

!! डॉक्टर डे निमित डॉ.रॉय साहेबांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना सप्ताहभर प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

                    श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजी.

                      गडचिरोली, मोबाईल- ७७७५०४१०८६.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या