🌟परभणी जिल्ह्यातील बालक बाल कल्याण समितीकडून सापडलेल्या बालकांच्या नातेवाईकांचा शोध....!


🌟30 दिवसाच्या आत संपर्क साधाण्याचे आवाहन🌟 


परभणी (दि.18 जुन 2024) : परभणी जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शासकीय मुलांचे बालगृह या संस्थेतील बालक बाल कल्याण समिती, परभणी यांच्या आदेशाने काळजी व संरक्षणासाठी दाखल झालेला असून साई संदीप इंगोले (10) आणि कृष्णा विद्यांचल दुबे (वय 14) या बालकाला संस्थेत दाखल झाल्यापासून आतापर्यंत कोणीही पालक किंवा नातेवाईक भेटण्यास आलेले नाहीत.

 तसेच तरी बालकाच्या पालक व नातेवाईक यांचा शोध घेण्यासाठी बाल कल्याण समितीने साई संदीप इंगोले हा रंगाने गोरा असून चेहरा लंबगोलाकार असून शरीराने सडपातळ आहे. त्याच्या डाव्या पायाच्या तळपायावर तीळ आहे त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये 17 जून 2019 रोजी शासकीय मुलाचे बालगृह, परभणी येथे दाखल करण्यात आले आहे. तर कृष्णा हा गोरा व सडपातळ असून, चेहरा लंबगोलाकार व मानेवर डाव्या बाजूला तीळ आहे. तो 14 जुलै 2016 रोजी संस्थेत दाखल करण्यात आला आहे. 

साई व कृष्णावर हक्क दाखवणारे माता पिता, पालक व इतर नातेवाईक यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आम्रपाली पाचपूंजे (9697970358) आणि अधीक्षक गोविंद अंधारे (9922625733) शासकीय मुलाचे बालगृह, परभणी आणि अधीक्षक श्री. लटपटे (9922914101) सप्त भूमी बालगृह केरवाडी यांच्याशी 30 दिवसाच्या आत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या