🌟जनतेने आपल्याला दिलेली साथ ही अत्यंत महत्वाची असून आशिर्वादरुपी दिलेले मतदान माझ्यासाठी बहुमोल ठरले....!


🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील भव्य नागरी सत्कार प्रसंगी खासदार संजय जाधव यांचे प्रतिपादन🌟 


परभणी : परभणी लोकसभा निवडणूकीत जनतेने आपल्याला दिलेली मोलाची साथ ही अत्यंत महत्वाची असून आशिर्वादरुपी दिलेले मतदान माझ्यासाठी बहुमोल ठरले. त्यामुळे आज आपण जनतेपुढे नतमस्तक होतो या शब्दात खासदार संजय जाधव यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले.

          परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात बुधवार दि.११ जुन २०२४ रोजी माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परभणी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनोगत व्यक्त करतांना खासदार जाधव म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत जनतेने आपणास भक्कम अशी साथ देत भरघोस मतदान केले. त्यामुळे आपण या निवडणूकीत विजयी होवू शकलो. माजी आमदार भांबळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने व मतदाराने दिलेली साथ आपल्यासाठी मोलाची ठरली, असे नमूद करीत खासदार जाधव यांनी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने मा.आ.भांबळे यांचे एकनिष्ठेने काम करावे व मतदारांनी भरघोस मतदान करुन त्यांना निवडणून आणावे, अशी विनंती केली. तसेच जिंतूर तालुक्यातील काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवावा, असे आवाहनही केले.

            यावेळी मा.आ.विजयराव भांबळे यांनी सांगितले कि, आम्ही आघाडी धर्म पाळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांचे एकनिष्ठेने काम केले. त्यामुळे त्यांना मतदार संघातून 13 हजार एवढे मताधिक्य मिळाले. आपल्या मतदार संघातील नागरिक हे सुजान असून शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे आहेत. त्यामुळे जातीधर्म न मानता सर्व समाजाने एकजीवाने भरगोस मतदान केले, असे ते म्हणाले.

          यावेळी प्रमोदराव भांबळे, विश्‍वनाथ राठोड, रामराव उबाळे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, मनिषाताई केंद्रे, साबिया बेगम कपिल फारुकी, आशाताई खिल्लारे, कैलास महाराज चारठाणकर, गणेशराव इलग, मनोहर डोईफोडे, दत्तराव काळे, शाहेद बेग मिर्झा, शोएब जानिमिया, लखुजी जाधव, शरद अंभूरे, मधुकर भवाळे, सलीम काझी, रामजी शर्मा, अरविंद कटारे, अनंतराव देशमुख, बालाजी नव्हाट,  कृष्णा राउत, तोडकर,  शौकत लाला, अक्कू लाला, आसेफिद्दिन काझी, गंगाधर तरटे, मनोहर सातपुते, बालाजी सांगळे,  नंदकिशोर अंभोरे, अशोक शिंदे, खय्युम कादरी, पंडित जाधव, अशोक प्रधान, बंडूभाऊ लांडगे, शिरकु पाटील, शंकर गंजे, मनोज रोकडे, अभिलाष राऊत, नागेश पुणेकर, परिक्षीत भांबळे, छत्रपती मानवते, झनक जाधव, रामेश्‍वर मुंढे, हकीम लाला, आसाराम म्हेत्रे,  मदन चव्हाण, शैलेश घुगे, अविनाश मस्के, संदीप काळे, नागेश पुणेकर, बबलू कदम, देवा जाधव, हबीब भाई, देविदास राठोड, शाहेद सिद्दिकी, विश्‍वंभर पवार, मांगीलाल राठोड, सतीश बरडे, प्रवीण चव्हाण,  राहुल कनकुटे, सुधाकर मस्के, साहेबराव चव्हाण, वसंत पाईकराव, राहुल घुले, माणिक सानप, शालिकराम गडदे, तसेच महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या