🌟पत्रकारितेला माणसात आणणारा महानायक गेला....!


🌟भारतातील सिने उद्योग आणि माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा आणण्यात ते अग्रेसर होते🌟

भारतातील बहुभाषिक माध्यम विश्वाला आकार देणारे ई टीव्ही नेटवर्क आणि रामोजी समुहाचे सर्वेसर्वा रामोजी राव यांनी आज शनिवारी पहाटे जगाचा निरोप घेतला ते ७८ वर्षाचे होते.भारतातील सिने उद्योग आणि माध्यम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा आणण्यात ते अग्रेसर होते. म्हणून रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात. ते रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे संस्थापक होते.  

देशाच्या ग्रामीण भागातील, गोरगरीब घरातील हजारो पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणून त्यांनी ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्न माध्यमांच्या व्यासपीठावर ठळकपणे मांडले. गाव खेड्यातील बातमीदाराला फक्त मान न देता, मानधन देण्याची प्रथा सुरू करणारे आणि स्ट्रिंगर नेटवर्कला महत्त्व देणारे ते पाहिले दूरदृष्टी दाखवणारे व्यक्तिमत्त्व होते.लोकशाही सुदृढ करण्याच्या त्यांच्या या अलौकिक कामगिरीसाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते गेल्या ४० वर्षांपासून अनेक चांगले पत्रकार घडवून एक नवे प्रबोधन पर्व सुरू करणारे रामोजी राव त्यांच्या अफाट योगदानामुळे कायम लक्षात राहतील असंख्य वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलना लोकाभिमुख करणाऱ्या या माध्यमविश्वाच्या महानायकास भावपूर्ण श्रद्धांजली........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या