🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील ग्रामरोजगार सेवकानेच मारला रोजमजूरांच्या हक्काच्या रोजमजूरीवर डल्ला....!


🌟आधार कार्ड रोजगार हमी योजनेतील रोजमजूरांचे वापरून असंख्य रोजमूरांची मजूरी केली स्वतःच्या खात्यावर वर्ग🌟 

पुर्णा (विशेष वृत्त : चौधरी दिनेश) - पुर्णा पंचायत समिती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामरोजगार सेवक पदाचा गैरवापर करीत रोजमजूरांच्या हक्काची रोजमजूरीवर ग्रामरोजगार सेवकांने जॉब कार्डवर चक्क स्वतःचे खाते क्रमांक टाकून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर प्रकार गौर गावात झाल्याचे नुकतेच उजेडात आले आहे.

या घटने संदर्भात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या घोटाळेबाज ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांच्या विरोधात गौर गावातील भगवान नरहरी जोगदंड व शरद विश्वनाथ जोगदंड यांनी दि.०९ मे २०२४ रोजी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे लेखी स्वरूपात रितसर तक्रार दाखल केली असून या तक्रारीत असे नमूद केले आहे की पुर्णा पंचायत समिती मधील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत ग्रामपंचायत गौर येथील ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेल्या मारोती पारवे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत आर्थिक गैरव्यवहार केला असून त्यांनी डब्ल्यूएलपी-बिडीओ गौर ज्ञानेश्वर सिताराम जोगदंड यांचे सिताफळ वैयक्तिक फळबाग लागवड कामाचा सांकेतांक : १८१७००८०४८/आयएफ/१२३५३९९३२० या कामाच्या मस्टरवर काम करणारे ज्ञानदेव सिताराम जोगदंड यांच्या जॉब कार्डवर चक्क स्वतःचे खाते क्रमांक टाकून प्रत्येकी १५३६/-रुपयें याप्रमाणे सहा (मस्टर क्रमांक ७४४०,८९०९,१०६४९,१३७२७,१७५८७,१९१३६) मसटरवरील मजूरी स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वर्ग करुन अपहार केला व त्याची मजूरी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी उपयोगात आणली सदरील जॉब कार्डवर अद्यापही ही त्यांचे स्वतःचे खाते क्रमांक जोडलेले दिसून येत असल्याने या.जिल्हाधिकारी यांनी पदाचा गैरवापर करीत आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांना तात्काळ त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करुन रोजमजूरांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना -२००५ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी असेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून संबंधित तक्रारीला एक महिन्याच्या वर कालावधी उलटल्यानंतर देखील संबंधित ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांच्यावर कठोर कारवाई झालेली दिसून येत नाही या संदर्भात रोहयो उपजिल्हाधिकारी संगिता चव्हाण यांनी दि.२४ मे २०२४ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) जिल्हा परिषद परभणी यांचे नावे जा.क्र.२०२३/मग्रारोहयो/आस्था/काविळ/६१८ अंतर्गत या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जारी केले असले तरी त्यांनी याप्रकरणी काय आणि कोणती चौकशी केली हे अद्यापही गुलदस्त्यातच असून वरिष्ठ अधिकारी संबंधित आर्थिक घोटाळेबाज मारोती पारवे यांना पाठीशी घालण्याचा प्रकार तर करीत नाही ना ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असा प्रकार एकाच रोजमजूरासोबत नव्हे तर रोजगारांसोबत देखील झाल्याचे समजते.........टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या