🌟परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे खा.संजय जाधव यांनी घेतली उध्दव ठाकरे व शरद पवार यांची भेट....!


🌟खा.जाधव यांनी भेटीतून कृतज्ञता व्यक्त करीत दोन्ही नेत्यांचा केला यथोचित सत्कार🌟


परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी शुक्रवार दि.०७ जुन २०२४ रोजी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची भेट घेवून कृतज्ञता व्यक्त केली.

            खासदार संजय जाधव यांनी सकाळीच मातोश्री गाठून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉ.राहुल पाटील,डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे हे उपस्थित होते या भेटी पाठोपाठ त्यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेवून भक्कम सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या