🌟गंगा दसरा समाप्ती विशेष : गंगाजीच्या पूजेत सर्व वस्तू दहा प्रकारच्या.....!


🌟या दिवशी लोक गंगा नदीत स्नान करतात आणि दान देतात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे🌟

दरवर्षी ज्येष्ठ मासारंभासह गंगादशहरा प्रारंभ होतो आणि ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल दशमीला गंगा दशहर समापन साजरा केला जातो. असे म्हणतात की गंगा दसरा सप्तमीच्या दिवशी माता गंगा भगवान शंकराच्या केसात अवतरली आणि त्यानंतर गंगा दसर्‍याला पृथ्वीवर अवतरली. याबद्दलची रोचक माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी या संकलित लेखातून सादर केली आहे... संपादक.      

       आज दि.१५ जुन २०२४ रोजी गंगा दशहरा आहे या सणाच्या दिवशी तिथी, नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीतून शुभ योग तयार होत आहेत. यासोबतच दिवसभर सिद्धी आणि रवियोग राहील. त्यामुळे स्नान-दान आणि गंगापूजनाचा हा सण आणखीनच खास बनला आहे. दहा योगाने बनला दशहरा. गंगा अवतरली तेव्हा ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी तिथी होती आणि हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, गर करण आनंद योग, चंद्र कन्या राशीत आणि सूर्य वृषभ राशीत होता. अशा वेळी गंगेची पूजा करून स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. हा योग फार दुर्मिळ आहे. या वेळी ज्येष्ठ महिन्याचा शुक्ल पक्ष, दशमी तिथी, हस्त नक्षत्र, गर करण, चंद्र कन्या राशीत आणि सूर्य वृषभ राशीत असेल. गंगा दसर्‍याला गंगा देवीची पूजा केली जाते आणि या दिवशी गंगास्नानालाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवी गंगा अवतरली होती, म्हणून गंगादशहरा साजरा केला जातो.

         या दिवशी लोक गंगा नदीत स्नान करतात आणि दान देतात. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने दहा प्रकारची पापे दूर होतात, असे सांगितले जाते. गंगा दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आणि मंत्रांबद्दल जाणून घेऊ- धार्मिक मान्यतेनुसार गंगा दसर्‍याच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पाप धुऊन जाते. यासोबतच मानसिक शांतीही मिळते आणि शरीर शुद्ध राहते. या दिवशी गंगा पूजन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. या प्रसंगी गंगेत स्नान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो, कारण राजा भगीरथने आपल्या पूर्वजांना वाचवण्यासाठी आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी आपल्या कठोर तपश्चर्येने माता गंगा यांना पृथ्वीवर आणले, अशी आख्यायिकाही सांगितली जाते. या दिवशी गंगेची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पुराणानुसार भागीरथच्या तपश्चर्येनंतर गंगा माता पृथ्वीवर आली तेव्हा ती ज्येष्ठ शुक्ल पक्षाची दहावी तिथी होती. गंगा मातेच्या पृथ्वीवर अवतरल्याचा दिवस गंगा दसरा म्हणून ओळखला जातो. या दिवशी जो गंगा नदीत उभे राहून गंगा स्तोत्राचा पाठ करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. स्कंद पुराणात दसरा नावाचे गंगा स्तोत्र आहे. जर तुम्हाला गंगा नदीवर जाता येत नसेल, तर तुम्ही गंगेचे ध्यान करताना घराजवळील कोणत्याही नदीत किंवा तलावात स्नान करू शकता. गंगाजीचे ध्यान करताना षोडशोपचाराने पूजा करावी. यानंतर या मंत्राचा जप करावा. मंत्राला पाच फुले अर्पण करून, गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी भागीरथीचे नाव मंत्राने पूजन करावे. यासोबतच गंगेचे उगमस्थानही लक्षात घेतले पाहिजे. गंगाजीच्या पूजेत सर्व वस्तू दहा प्रकारच्या असाव्यात. उदाहरणार्थ, दहा प्रकारची फुले, दहा सुगंधी, दहा दिवे, दहा प्रकारचा नैवेद्य, दहा सुपारीची पाने, दहा प्रकारची फळे असावीत. पूजेनंतर दान करायचे असेल तर दहाच वस्तूंचे दान करावे, कारण ते चांगले मानले जाते, पण जव आणि तीळ यांचे दान सोळा मुठींचे असावे. दहा ब्राह्मणांनाही दक्षिणा द्यावी. गंगा नदीत स्नान करताना दहा वेळा स्नान करावे, असे सांगितले जाते. गंगा मातेचे वरदान मिळवण्यासाठी  ''ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः'' या मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि त्याला परम पुण्य प्राप्त होते. 


           गंगादशहराच्या दिवशी गंगा देवीची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात, असेही म्हटले जाते. या दिवशी पूजा करताना मंत्रासोबतच भगवान भोलेनाथाची पूजा करण्याचाही नियम आहे. गंगादशहराचा दिवस हा सिद्ध मुहूर्ताप्रमाणेच शुभ आणि फलदायी मानला जातो. या दिवशी नवीन सुरुवात आणि खरेदी दीर्घकालीन लाभ देतात. यासोबतच शास्त्रानुसार या दिवशी पाणी, पंखा, खरबूज, भांडे आणि आंबा दान करण्याचाही नियम आहे. दहा प्रकारची पापे संपतात, सांगितले जाते की, गंगादशहराला गंगा नदी किंवा गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने दहा प्रकारची पापे नष्ट होतात असे मानले जाते. यामध्ये ३ प्रकारची शारीरिक, ४ प्रकारापर्यंत वाक्‍यांमुळे होणारी पापे आणि ३ प्रकारची मानसिक पापे समाविष्ट आहेत, म्हणून हिंदू धर्मात असे म्हटले आहे की, आयुष्यात एकदा गंगेत स्नान केलेच पाहिजे. गंगादशहराच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगाजल दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते.

!! गंगा दसरा समाप्तीच्या सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

                 - संकलन व शब्दांकन -

                 श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                  पोटेगावरोड, गडचिरोली.

                  फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या