🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟लबाडांच्या नादी लागून आरक्षण मिळणार नाही,त्यासाठी केंद्रात भांडलं पाहिजे ; खासदार अरविंद सावंतांची टीका🌟 

* राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, छगन भुजबळांच्या उपस्थितीत दहा दिवसांनी उपोषण सोडलं, अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन जातिय जनगणनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचे छगन भुजबळांनी सांगितले 

* सरकारचा खेळ मॅनेज, छगन भुजबळाचं ऐकून जर मराठ्यांची वाट लावायची असेल तर आमचा नाईलाज,परिणाम भोगावा लागेल ; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा 

* औकातीत राहा बेट्या हो...मनोज जरांगेंवर छगन भुजबळ कडाडले, पंकजा मुंडेंच्या पराभवाचाही उल्लेख ; अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए है, शायद अपनी याद दिलानी होगी ; छगन भुजबळांचं घणाघाती भाषण 

* मराठ्यांना डावलून वंजारी,माळी,धनगरांना आरक्षण दिलंय ; एकदाची जातनिहाय जनगणना करुन टाका,उदयनराजे भोसलेंची मागणी ; 

* सरकार मराठ्यांना फसवतेय,सग्यासोयऱ्याची अमंलबजावणी झाली नाही त्यामुळे मराठ्यांना न्याय मिळाला नाही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे वक्तव्य 

* लबाडांच्या नादी लागून आरक्षण मिळणार नाही,त्यासाठी केंद्रात भांडलं पाहिजे; खासदार अरविंद सावंतांची टीका  

* मनोज जरांगेंना शरद पवारांचं पाठबळ, पवारांचं राजकारण कायमच ओबीसीविरोधी; भाजप आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप 

* अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची इच्छा,आगामी काळातील राजकारण बदलू शकते,अमोल मिटकरींचे  मत 

* विधानपरिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी, आत्तापर्यंत 35 जणांचे अर्ज, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान  

* अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे ऑफिस देण्यास टाळाटाळ, कुलूप तोडून थेट खासदार कार्यालयाचा ताबा, खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर आक्रमक 

* रावसाहेब दानवेंकडून नांदेडच्या पराभवाचं अ‍ॅनालिसिस, पण गाजावाजा करुन भाजपमध्ये आणलेल्या अशोक चव्हाणांची बैठकीला गैरहजेरी, उलट-सुलट चर्चा 

* येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट; एनडीआरएफची टीम तैनात  ; कोकण, विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला , तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस , तर अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा; मुंबईकरांना देखील पावसाची प्रतीक्षा 

* राहुल नार्वेकर यांना सत्र न्यायालयाचा दणका, 3 हजारांचा दंड ठोठावला, मविआ काळातील आंदोलनाच्या खटल्याच न्यायालयाने ठोठावली दंड 

* प्रेमविवाहानंतर मुलगा झाला,पण सहलीत पत्नीचं दुसऱ्याशी सूत जुळलं, प्रियकराच्या साथीने मुलाला घेऊन पसार,पतीची कोर्टात याचिका

शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचे संकट, मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या