🌟कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी समिती स्थापन....!


🌟श्रीमती अर्चना मनतकर आणि अशासकिय सदस्य म्हणून ॲड.मनीषा मुंडे यांची निवड🌟 

परभणी : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम - 2013 आणि महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती एस.बी.शिंदे तर सदस्य संरक्षण अधिकारी म्हणून व्ही.पी.नागरे विधी सल्लागार श्रीमती मिताली मोतीकर परीविक्षा अधिकारी (म. वि.) श्रीमती अर्चना मनतकर आणि अशासकिय सदस्य म्हणून ॲड. मनीषा मुंडे यांची निवड करण्यात आली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ करत असल्याचे सिद्ध झाल्यास त्या प्रतिवादीविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सेवा नियमाप्रमाणे किंवा असे नियम नसल्यास विहित नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. लेखी समज देणे, ठपका ठेवणे, पगार वाढ किंवा वार्षिक पगार वाढ थांबवणे, बढती थांबविणे, निलंबन बडतर्फ करण्यात येईल. पगारातून नुकसान भरपाईची कपात व पीडित महिलेला व ती मृत असल्यास तिच्या कायदेशीर वारसांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येईल. स्थापन झालेली समिती ही रक्कम ठरवेल. जर मालकाला या रक्कमेची प्रतिवादीच्या वेतनातून कपात करणे शक्य नसेल तर समिती प्रतिवादीस ही रक्कम पीडित महिलेला देण्याची शिफारस करेल. ही नुकसान भरपाई न दिल्यास अंतर्गत तक्रार समिती अथवा स्थानिक तक्रार समिती जिल्हा अधिकाऱ्याकडे महसूल नियमानुसार वसुली करण्यासाठी शिफारशीची प्रत पाठवेल.

समितीचे कामकाज पाहण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून परभणी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी प्रत्येक तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) वर्ग 2 व शहरी कार्यक्षेत्रासाठी प्रत्येक नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि महानगरपालिकेचे वार्ड ऑफिसर यांची त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रा करिता नेमणूक करण्यात आली आहे.कामाच्या‍ ठिकाणी महिलांच्या लैगिंक छळापासून संरक्षण करण्यासाठी महिलांनी 181 या महिला हेल्पलाईन क्रमांक आणि शिघ्र कृती दलाच्या मदतीसाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या