🌟परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम.....!


🌟परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण संपन्न🌟 

भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडयातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पा अंतर्गत दि. 01 जुन 2024 रोजी कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मुळी ता. गंगाखेड जि. परभणी येथील प्रगतशिल शेतकरी श्री. साहेबराव (आबा) भोसले यांच्या प्रक्षेत्रावर विशेष शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रकल्पा अंतर्गत दादा लाड तंत्रज्ञाना नुसार कापसाची लागवड या बाबी अंतर्भुत केलेल्या आहेत. त्या अन्वये दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. दादा लाड, व श्री. अमित तुपे, शास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक विशेष कापूस प्रकल्प कृषि विज्ञान केंद्र, परभणी हे उपस्थित होते. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी श्री. अमित तुपे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना या प्रकल्पाचा उद्देश, महत्व व याची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे. या बाबत सविस्तर माहिती दिली. यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना सघन व अतीसघन कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी पुढील हंगामात दादा लाड तंत्रज्ञान लागवड पध्दतीचा वापर करुन आपल्या उत्पादकतेमध्ये वाढ करावी असे आवाहन करण्यात आले.

प्रमुख तांत्रिक सत्रामध्ये श्री दादा लाड यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या लागवड पध्दती बद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर, गळ फांदी काढुन टाकणे, शेंडा खुडुन झाडांची उंची पारंपारीक पध्दतीपेक्षा कमी ठेवुन फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या मर्यादित ठेवुन त्यांचा आकार वाढल्यामुळे उत्पादनात वाढ होईल या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. 

दोन झाडातील अंतर कमी असल्यामुळे प्रति हेक्टरी झाडांची संख्या जरी वाढली तरी गळ फांदी काढल्यामुळे झाडावरील गर्दी कमी होवुन हवा खेळती राहील व सर्व झाडास सुर्यप्रकाश मिळेल तसेच रोगांचा प्रादुर्भाव सुध्दा कमी होईल. झाडावरील गळ फांदीची ओळख कशी करावी याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन केले.

या लागवड तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब केल्यास त्यांच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होईल असे प्रतिपादन केले. तसेच काही प्रगतशिल शेतकऱ्यांनी दादा लाड लागवड तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व उत्पादन खर्चामध्ये कपात झाल्या बाबतचे अनुभव व्यक्त केले या तंत्रज्ञानाच्या अवलंब केलेल्या प्रक्षेत्रावर एकरी किमान 14 ते 16 क्विंटल कापूस उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. उषा सातपुते तसेच आभार प्रदर्शन श्री. नामदेव काळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुळी, ईसाद, धारखेड, अंगलगाव, माळसोन्ना, गंगाखेड तालुक्यातील जवळपास 140 शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, परभणी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी व विशेष कापूस प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले..... 

वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख 

कृषि विज्ञान केंद्र, परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या