🌟परभणी लोकसभा मतमोजणीच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठ परिसरातील वाहतुकीत बदल....!

🌟शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन🌟

परभणी (दि.03 मे 2024) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय  परिसरात 17- परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी दि. 04 जून रोजी होणार आहे.

सुरक्षिततेच्या अनुषंगाने 4 जून रोजी सकाळी 5 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत विद्यापीठ गेट (काळी कमान) येथून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेचे पासधारक, संबंधीत ओळखपत्रधारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तरी सकाळी मॉर्निंग वॉक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव प्रवेश देण्याचा आग्रह करू नये.

सेंद्रा, सायळा, बलसा, माखणी, इठलापूर, लोहगाव इत्यादी गावातील नागरिकांनी दि. ४ जून रोजी सकाळी 5 वाजेपासून रात्री 8 पर्यंत परभणी शहरात येण्या-जाण्यासाठी नवोदय विद्यालय साकला प्लॉट, अनुसया टॉकीज या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

मतमोजणीसाठी येणारे मतमोजणी प्रतिनिधी व निकाल ऐकण्यास येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने वैद्यनाथ वसतीगृहाच्या बाजूच्या मैदानातच पार्क करावी. तसेच मतमोजणीकरिता येणारे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व पत्रकारांनी देवगिरी वसतीगृहाशेजारील मोकळ्या जागेत आपली वाहने पार्क करुन वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे.

मतमोजणी कक्षामध्ये व परिसरात निवडणूक आयोगाने विनीर्दिष्टीत केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर कुणालाही मोबाईल व तत्सम ईलेक्ट्रॉनीक डिव्हाईस घेवून जाता येणार नाही. करीता सर्वांनी आपापले मोबाईल स्वतःचे घरी किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करण्याचे करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या