🌟कारंजा न.पा. द्वारा संचालित उर्दू,मराठी शाळांसह महाविद्यालयात अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी...!


🌟राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन,आंदोलनाचा इशारा🌟 

फुलचंद भगत

वाशिम:-कारंजा नगरपरिषद द्वारे संचालित उर्दू व मराठी शाळा तसेच महाविद्यालयात शैक्षणिक सत्र-२०२४-२५ सुरू होण्याचे पूर्वी सर्व शाळांची साफसफाई,रंगरंगोटी, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स बेंच,पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था,बोर्ड व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असलेल्या मैदानाची साफसफाई,वर्गखोल्यात आवश्यकते नुसार व विद्यार्थी संख्ये पंखे,लाईट व संगणक कक्षात विद्युत व्यवस्था, प्रयोगशाळेत डिजिटल बोर्ड, वृक्षांना पाणी देण्यासाठी बोअरवेल दुरुस्ती,नवीन मोटरपपं, विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता स्वतंत्र शौचालय व्यवस्था आदी बाबी वर योग्य रित्या देखभाल करून सदर बाबी उपलब्ध करून देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनाखाली २६ जून रोजी कारंजा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  शैक्षणिक सत्र २०२४-२५ सुरू होण्यापूर्वी सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही तर जनहितार्थ भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक नितिन गढ़वाले, न.प गटनेता ॲड. फिरोज शेकुवाले, जाकिर शेख, सलीम गारवे,अ. रशीद, शेख यूनुस पहेलवान, जावेदोद्दीन, निसार खान, मो. अकबर मो. अफजल, चांद मुन्नीवाले, नदीम राज, यूसुफ खान मौलाना, नासिर खान, उस्मान खान, शकील नौरंगबादी,शेख फहीम, जूनैद बेग, साजिद शेख, गणेश राऊत, अ. वहीद, मुजफ्फर शेख, सलमान वीरानी, शब्बीर खान, नईम खान, प्रफुल्ल ढोके, आरिफ भाई, मोहसिन शेख, शारिक शेख मोहसिन, तुषार बनसोड, रवि गजभिये, मो. साजिद, शाहिद अहमद , शोएब खान, शाहबाज खान,सदीम नवाज,मुजाहिद खान यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस के पदाधिकारी तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या