🌟पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडीया कंपनी कडून जमीन मोबदल्याचा मार्ग मोकळा....!


🌟आमदार अमित झनक यांची जमीन मोबदला मिळवून देण्या संदर्भात कंपनीशी यशस्वी चर्चा🌟


फुलचंद भगत

वाशिम:-पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडीया कंपनीच्या कडून राज्यातील महानगरातील औद्योगिक कंपन्या साठी उच्च दाबाच्या वाहिण्याचे टावर उभारण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकांच्या सुपीक जमीनचे नुकसान झाले त्या ठिकाणची शेती पडीक पडल्यामुळे उत्पन्नामध्ये घट निर्माण झाल्याने नुकसान झाले असून त्याचा कोणताही मोबदला न मिळाल्याने आमदार अमित झनक यांनी सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो मिळवून देण्यासाठी बोलणी केली आहे.


   या संदर्भात पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडीया कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी आमदार अमित झनक यांनी १९ जून रोजी छत्रपती संभाजी नगर येथे चर्चा केली या चर्चेतून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे रिसोड-मालेगांव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन मधून विशालकाय अतिउच्च दाबाने विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहीण्यांचे अवाढव्य असे टावर उभारले गेले आहेत. सदर टावरचे काम पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी ने केलेले आहे. मागील अनेक वर्षांपासून रिसोड व मालेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे या विशालकाय टावर मुळे उत्पन्न घटल्याने पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आसल्याची तक्रार नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार झनक यांच्याकडे केली होती.

     त्यामुळे १९ जून रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आमदार अमित झनक यांनी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडीया कंपनीचे मुख्यप्रबंधक आर.एम. पाटील, उपमहाप्रबंधक दिनेश चोपडे, यांच्याशी मोबदल्या संदर्भात यशस्वी चर्चा केली आहे. यावेळी रिसोड-मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी वर्गाची आवर्जुन उपस्थिती होती या चर्चे मधून शेतकऱ्यांना कंपनीकडून मोबदला मिळणार आहे त्याकरिता मात्र शेतकऱ्यांना आवश्यक त्या दस्तऐवज व कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या