🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा....!


🌟यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव प्रा.डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले वृक्षारोपण🌟 


पुर्णा (प्रतिनिधी) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयामध्ये आज दिनांक ०५ जून रोजी पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.डॉ. संतोष कुऱ्हे यांनी मांडले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रभाकर किर्तनकार यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ.विलास काळे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दता कदम,डॉ.ज्ञानेश्वर डाखोरे, पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम हंकारे , बालासाहेब देवणे , वरिष्ठ लिपिक माणिक कदम, सूर्यकांत भोसले, ज्ञानोबा मुळे, यादव कल्लाळीकर , गिरधारी कदम, ज्ञानोबा कदम, रामेश्वर भाले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या