🌟परभणी जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त पेढ्यांमध्ये साठा वाढवा - डॉ.नागेश लखमावार


🌟रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तसाठा व रक्त घटकांची कमतरता जाणवत आहे🌟

परभणी (दि.19 जुन 2024) : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून, जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचविण्यासाठी पुढे यावे. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे.

सद्या रक्तकेंद्रात थॅलेसेमिया व इतर रुग्णांची वाढती संख्या आणि रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तसाठा व रक्त घटकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकास रक्तपिशवी मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी, सामाजिक संस्थांनी, विविध पक्ष-पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेच्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रक्तकेंद्रास सहकार्य करावे. जेणे करून रुग्णसेवा सुरळीत चालू राहून गरजू रुग्णांचे जीव वाचविण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे. 

* रक्तदात्यांचा सत्कार सोहळा :-

राज्य संक्रमण परिषद, मुंबई यांच्या परिपत्रकानुसार रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय, परभणी येथे दि. 25 जून रोजी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबीर आयोजकांचा रक्तदान शिबीर आयोजकाबरोबरच 25 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या ऐच्छिक रक्तदात्यांचा सुद्धा विशेष सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तरी रक्तदात्यांनी आपले रक्तदान केलेले प्रशस्तीपत्र दि. 24 जून पूर्वी रक्तकेंद्रात आत्माराम जटाळे, समाजसेवा अधीक्षक यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या