🌟मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय....!


🌟यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित🌟

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

🔴 मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :-

विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता ७५ हजार ऐवजी १० हजार रुपयांचे शुल्क

✅चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट

✅विरार ते अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मान्यता

✅पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून ५ हजार ५०० कोटी कर्जास मान्यता

✅मुंबई मेट्रो-३ लवकरच सुरु होणार; शासनाच्या  हिश्श्याची ११६३ कोटी एवढी रक्कम रक्कम थेट मुंबई मेट्रो रेलला देण्यास मान्यता

✅रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्यात सुधारणा; रेसकोर्सवर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम होणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'सेंट्रल पब्लिक पार्क' हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार

✅मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३ हजार ९०९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ३१० मिलियन डॉलर्स कर्जास मान्यता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या