🌟श्रीक्षेत्र बासर येथे दि.१६ व १७ जुन रोजी ऐतिहासिक सामुहिक सरस्वती पुजन सोहळा व विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन....!


🌟या उपक्रमात शालेय मुले युवक/युवतींसह पालक एकत्रितपणे सामुहिक पध्दतीने सरस्वती मातेचे पुजन करणार🌟


दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने दि.१६ व १७ जुन २०१४ रोजी श्रीक्षेत्र बासर येथे ऐतिहासिक सामुहिक सरस्वती माता पुजन व विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची व बुध्दीची देवता म्हणून श्री सरस्वती मातेस प्रथम स्थान देण्यात आलेले आहे या सामुहिक सरस्वती पुजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मुल्यसंस्काराची शिकवन रुजविण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात येणार असून या उपक्रमात शालेय मुले युवक/युवतींसह पालक एकत्रितपणे सामुहिक पध्दतीने सरस्वती मातेचे पुजन करणार आहेत.दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने नेहमीच समाज उपयोगी अशा अठरा विभागांच्या माध्यमातून विविध ज्ञान विनामूल्य जनसामान्यांन लोकांपर्यंत पोहचवण्यात येते या सेवा कार्यातील बालसंस्कार  विभागाच्या वतीने विविध उपक्रमातून व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा,पर्यावरण जनजागृती,गडकिल्ले संवर्धन अशा अनेक विषयांवर सामाजिक प्रबोधन करण्यात येत असते.

यावेळी श्रीक्षेत्र बासर येथे दि.१६ जुन २०२४ व दि.१७ जुन २०२४ या सतत दोन दिवस सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत सरस्वती माता सामुहिक पुजन व विद्यारंभ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे दि.१६ तारखेला मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांची उपस्थिती श्रीक्षेत्र बासर या ठिकाणी लाभणार असून इतर जिल्ह्यानी दि.१७ तारखेला सरस्वती माता सामुहिक पुजन व विद्यारंभ सोहळ्याला उपस्थित राहायचे आहे या सोहळ्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार असून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पालक आणि मुलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या