🌟नांदेड येथील हजुरी सिख समुदायाचा जत्था श्री हेमकुंड साहेब तिर्थयात्रेसाठी रवाना.....!


🌟श्रीगंगानगर एक्स्प्रेसने आज रविवार दि.०२ जुन रोजी ११.०० वाजता श्री हेमकुंड साहीब यात्रेसाठी रवाना🌟 

नांदेड (दि.०२ जुन २०२४) - हुजूर साहीब नांदेड येथील हुजूरी सिख समुदायाचा जत्था आज रविवार दिनांक ०२ जुन रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीगंगानगर एक्सप्रेसने सिख धर्माचे दहावे गुरु दसमपिता साहीब श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचे पवित्र तपस्थान असलेल्या पावन तिर्थक्षेत्र श्री हेमकुंड साहेब तिर्थयात्रेसाठी रवाना झाले. 


हजुर साहेब नांदेड येथून श्री हेमकुंड साहेब तिर्थयात्रेसाठी रवाना झालेल्या जत्थामध्ये बाबा फतेहसिंघ जी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी तख्त सचखंड श्री हजूर साहेब येथील माता भागोजी स्थानचे सेवक स .सचविंदरसिंघ कोमलसिंघ बुंगई,स.जसपालसिंघ पाटनुरवाले, ऋषिकेश राठोड यांचा समावेश असुन सदरील तिर्थयात्रेकरुन नांदेड ते दिल्ली, दिल्ली ते ऋषिकेश, ऋषिकेश ते गोविंदघाट, गोविंदघाट ते श्री हेमकुंड साहेब,हेमकुंड साहेब ते बद्रीनाथ,बद्रीनाथ ते पौंटा साहेब,पौंटा साहेब ते तख्त श्री आनंदपूर साहेब,तख्त श्री आनंदपूर साहेब ते श्री अमृतसर साहेब या पवित्र तिर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन परत श्री हजूर साहेब नांदेड येथे येणार आहेत........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या