🌟परळी तालुक्यातील मौ.सारडगाव येथील सुरेश श्रीहरी बोबडे यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पाश्चात्य एक बंधु,पत्नी,दोन मुले,एक मुलगी, असा मोठा परिवार आहे🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील मौजे सारडगाव येथील शेतकरी सुरेश श्रीहरी बोबडे वय ५१ वर्ष यांचे आज रविवार,दि.02 जून 2024  रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सुरेश श्रीहरी बोबडे यांच्यावर पार्थिवावर सारडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.राख सावडण्याचा विधी मंगळवार, दि.०४ जून रोजी सकाळी ०७-०० वाजता होणार आहे पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी तथा परळी वैजनाथ-अंबाजोगाई पंचायत समिती कर्मचारी पतंसंस्थेचे व्हाईस चेअरमन निळकंठ दराडे यांचे ते मेहुणे होत.  

              तालुक्यातील मौजे सारडगाव येथील शेतकरी सुरेश श्रीहरी बोबडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रविवार दि.०२ जून २०२४ रोजी पहाटे ०२.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली मृत्यू समयी ५१ वर्षे होते. शेतकरी कै.सुरेश श्रीहरी बोबडे हे अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. यांच्या निधनाने सारडगाव व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सारडगाव येथील शेतकरी सुरेश श्रीहरी बोबडे यांच्या पाश्चात्य एक बंधु, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा मोठा परिवार आहे.

    कै.सुरेश बोबडे यांच्या पार्थिवावर मुळ गावी सारडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या या अंतयात्रेत सर्व स्तरातील नागरिक, राजकीय, व्यापारी, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस कर्मचारी व नातेवाईक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कै.सुरेश श्रीहरी बोबडे यांच्यावर कोसळलेल्या दुःखात परिवार सहभागी आहे.....


राख सावडण्याचा कार्यक्रम 

       राख सावडण्याचा विधी मंगळवार, दि.04 जून रोजी सकाळी 7 वा. होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या