🌟जळगाव जिल्हा रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष पदावर निलेश महाजन यांची निवड....!


🌟कार्यकर्ते पदाधिकारी व मित्र परिवाराने त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या🌟                            

 पुणे :- रुग्ण हक्क संघर्ष समिती बगर राजकीय सामाजिक संघटन संस्थापक प्रमुख ॲड विजयभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली दि. १० जुन २०२४ रोजी रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे शहर कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी शहर उपाध्यक्षा सौ.किरण पाचपांडे यांनी सुचवलेले सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून उत्साहाने कार्य करणारे व सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील त्यांची आवड पाहून त्यांची जळगाव जिल्ह्याध्यक्ष पदी निलेश महाजन यांची निवड करण्यात आली. रुग्ण हक्क संघर्ष समिती संपूर्ण जळगाव जिल्ह्यात व तालुक्यात संघटन बळकट करण्यासाठी व तळागाळातील रुग्ण व रुग्ण हितार्थ व हक्कासाठी जनजागृती साठी सदैव ते कार्य करणार आहेत.                          

 यावेळी संस्थापक सचिव विश्वासजी कुलकर्णी, उपाध्यक्ष संजय सुरवसे, सह सचिव संतोष सोनवणे, प्रदेश सदस्य शेखर बामणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवीजी गजे व शहराध्यक्ष संजय बावळेकर, प्र.संघटक किरण बडे, प्र.महिला संघटक गायत्री देभे, राहुल ताटे, शषांक घाडगे, अमर जगताप, जेष्ठ समाजसेवक त्र्यंबकजी स्वामी, महिला पुणे जिल्ह्याध्यक्षा मंगल अशोक जाधव, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा सौ माधुरी कोलते, उपाध्यक्षा किरण पाचपांडे, लातूर जिल्हाध्यक्षा सौ कल्पना मोरे, नगर महिला संपर्क प्रमुख माधुरी चव्हाण, तथा सुमन गिरी, तर आयशाबी बेग, परवेज पटेल, किरण काळे, रवी घोडके, निलेश पवार, बालाजी जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या