🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात बळीराजा पेरणीच्या लगबगीत व्यस्त......!


🌟यावर्षी लवकर मान्सून व जास्त पाऊस बरसणार असल्याचा अंदाज🌟

फुलचंद भगत

वाशिम :- मंगरूळपीर तालुक्यात यावेळी मान्सूनच्या पावसाने आगमन गतवर्षी पेक्षा लवकर झाले आणि पाऊस सुद्धा जास्त पडून पेरणीला लवकर सुरुवात झाली आहे.

        मागच्या वर्षी उशिराने म्हणजे २३ जून रोजी मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले होते,पण जून महिन्यात पेरणी योग्य पाऊसच पडला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली नाही. एकद चार जुलैला रात्रीला ४०.२ मी.मी.पाउस पडला आणि ५ जुलैला सार्वत्रिक पेरणीला सुरुवात झाली होती.गतवर्षीची तुलना करता यावेळी हवामानाच्या अंदाज प्रमाणे मान्सूनच्या पावसाने आगमन झाले.तालुक्यात चार ते सहा जुनला १०० मी.मी.पाउस  जोरदार पाऊस पडला आणि काही शेतकऱ्यांनी सात जुन रोजी पेरणीला सुरुवात केली.मात्र मंगरुळपीर तालुक्यात पेरणीला खरी सुरुवात दहा जुन पासून झाली आहे.मागच्या वर्षी चार जूनला मान्सून पूर्व ४० मी.मी.पाऊस पडला होता आणि त्यानंतर पंधरा दिवस उघाडं दिली.पंधरा जून पर्यंत फक्त ४२.८ मी.मी.पाऊस पडला होता; तर चार आणि पाच जुलै या दिवसात ५३.६ पडला आणि पेरणीला सुरुवात झाली होती.यावेळी चार जूनला ५० मी.मी.पाच जून ५.६ मी.मी.सहा जून ४७.६ मी.मी.सात जून ७ मी.मी.आठ जून ६.४.मी.मी.नऊ जून ४.४ मी.मी.आणि दहा जूनला ७.२ मी.मी.असा फक्त दहा दिवसांत १२८ मी.मी.अगदी पेरणी योग्य पाऊल पडल्याने पेरणीला गतवर्षी पेक्षा लवकर सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या समाधानी दिसत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या