🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूरात ओबीसी समाजाकडून जोरदार चक्काजाम आंदोलन....!


🌟ओबीसी आरक्षण बचाव समर्थनार्थ ठिकठिकाणी करण्यात आला रास्ता रोको🌟

परभणी (दि.२२ जुन २०२४) : जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रा.लक्ष्मणराव हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज शनिवार दि.२२ जुन २०२४ रोजी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने जिंतूरात जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

             मौजे वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर येथे भव्य रॅली काढून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर जोरदार रस्ता रोको आंदोलन करून जालना व परभणी रोड बंद करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे जिंतूरच्या तहसीलदारांना आपल्या मागण्यांसदर्भातील निवेदन देण्यात आले. त्याद्वारे, सध्या महाराष्ट्रात ओबीसी व मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्‍न आहे. सरकारने सगेसोयरे बाबतीत २६ जानेवारी २०२४ रोजी तयार केलेला मसुदा ओबीसी प्रवर्गांवर अन्यायकारक आहे. त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यावर खाडाखोड करून जवळपास 54 लक्ष कुणबी प्रमाणपत्राचे शासनाकडून वाटप करण्यात आले. ज्या बेकायदेशीर नोंदी केल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात, अन्यथा जिंतूर येथे साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या