🌟पंजाब मधून तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेडला पोहोचणाऱ्या गाड्या उशिरा धावत असल्याने भाविकांमध्ये प्रचंड विरोध...!


🌟नांदेड तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजयसतबीर सिंघ यांच्या आदेशाने शिष्टमंडळाने घेतली डिअरएम यांची भेट🌟 


नांदेड (दि.20 जून 2024)  - नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक तथा पुर्व आयएएस.अधिकारी डॉ.विजय सतबीरसिंघ यांच्या आदेशानुसार आज गुरुवार दि.२० जुन २०२४ रोजी तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या एका विशेष शिष्टमंडळाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांची भेट घेऊन सचखंड  एक्सप्रेससह पंजाब राज्यातून येणाऱ्या इतर सर्व प्रवासी रेल्वे एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत असल्याने नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अत्यंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने भाविकांची अडचण तात्काळ सोडवण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावी व सचखंड एक्सप्रेससह पंचाब राज्यातून हुजुरी साहीब नांदेड येथे येणाऱ्या सर्व प्रवासी एक्सप्रेस गाड्या आपल्या नियोजित वेळेत धावतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांच्याकडे करण्यात आली आहे.

नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड हुजूर साहीब येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वे गाड्या वेळेवर धावल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उन्हाळी हंगामामुळे चार ते पाच तास थांबण्याचा त्रास होणार नाही. रेल्वे स्थानकाच्या प्रतिक्षेमुळे प्रवाशांना अनेक समस्या निर्माण होतात. ज्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात आणि मार्गात थांबल्यामुळे आणखी उशीर होतो, त्यानंतर डब्यांमध्ये पाण्याची कमतरता असते आणि स्वच्छता अत्यंत खराब होते, ज्यामुळे यात्रेकरूंच्या अडचणी वाढतात गुरुद्वारा दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली, त्यावर डी. आर.एम. मॅडम नीती सरकार यांनी या समस्या अतिशय लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि सांगितले की, भाविकांना येणाऱ्या अडचणींबद्दल आम्हाला खेद वाटतो आणि अनेक ठिकाणी तांत्रिक कामे सुरू आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

पंजाबहून गुरुद्वारा दर्शनासाठी येणार्या भाविकांना होत असलेल्या त्रासावद्दल डॉ. विजय सतबीर सिंघ लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती स. जसवंत सिंघ बॉवी दिल्ली यांनी दिली........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या