🌟परभणी जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहन नोंदणीसाठी नवी मालिका सुरु....!


🌟जास्तीत-जास्त वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी अर्ज करावे असे त्यांनी कळविले आहे🌟


परभणी (दि.०७ जुन २०२४) : परभणी जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी (एलसीवाय) वाहनांसाठी लवकरच एमएच-२२-बीई ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यात विहित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांच्या नावे कार्यालयात दि.०६ जुन ते १० जून २०२४ दरम्यान सकाळी १०.०० ते दुपारी ०२.३० पर्यंत खिडकी क्र.०६ सहाय्यक रोखपाल यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी केले आहे.

नविन नोंदणी वितरकांच्या स्तरावर होत असल्यामुळे लिलाव दिनांकात बदल करण्याचा पूर्ण अधिकार या कार्यालयाकडे राहील. एका पसंती क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासच लिलाव घेण्यात येईल. तसेच नोंदणी क्रमांक वितरकाच्या स्तरावर मंजूर होत असल्याने काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास लिलाव मागील किंवा पुढील दिनांकास करण्याचे सर्वाधिकार या कार्यालयाकडे राहतील, तरी जास्तीत-जास्त वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी अर्ज करावे, असे त्यांनी कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या