🌟पुर्णा शहरातील आनंद नगरातील पाण्याच्या गंभीर प्रश्नी नगर परिषदेचा कारभार 'आंधळ दळतय कुत्रं पिठ खातय' असा....!


🌟परिसरातील असंख्य नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील गाळाच्या उपश्याकडे मुख्याधिकारी पौळ यांचें दुर्लक्ष🌟 


पुर्णा (दि.१८ जुन २०२४) :- पुर्णा शहरातील आनंदनगर परीसरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या व परिसरातील नागरिकांची तहान भागवणाऱ्या पुरातन विहीरीचा गाळ तात्काळ उपसण्यात यावा या मागणी संदर्भात परिसरातील नागरिकांनी आज मंगळवार दि.१८ जुन २०२४  निवेदन देऊन झोपेचं सोंग घेतलेले मुख्याधिकारी युवराज पौळ यांना जागविण्याच्या उद्देशाने निवेदन दिले.


शहरातील आनंद नगर परिसरात असलेली सदरील विहीर ही जवळपास पन्नास ते साठ फुट खोल आसून या विहीरीचे पाणी आजुबाजुला राहणारे जवळपास साठ सत्तर कुटुंब वापरतात ज्या वेळी पाणीटंचाई भिषन स्वरुप धारण करते त्या वेळी सदरील विहीर ही परिसरातील नागरीकांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी अंत्यंत उपयुक्त ठरते परंतु या परिसरातील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की नगर परिषद प्रशासनाला याची यत्किंचितही जाणीव नाही पाणीटंचाई काळात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्चुन देखील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पाणी पोहचत नाहीत परंतु हीच विहीर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवते परंतू आनंद नगर परिसरातील ही विहीर आज गाळाने जवळपास पंधरा फुट बुजल्यामुळे विहिरीतील पाणी साठा कमी झाला आणी नागरीकांच्या पाण्याच्या समस्येत भर पडलीय मागील काळात ही गंभीर बाब परिसरातील नागरिकांनी सर्व स्थानिक लोकप्रतीनीधींच्या देखील कानावर घातली परंतु निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज मंगळवारी परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनास पुन्हा निवेदन देऊन विनंती केली कि सदर विहीरीचा गाळ उपसुन विहीरीचे पुनर्जीवन करावे ज्या मूळे सर्व नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणी नगर परिषद प्रशासनाचा पाणीपुरवठ्यावर प्रत्येक वर्षी होणारा लाखों रुपयांचा खर्च वाचेल आणी नागरीकांची ही समस्या सुटेल त्या मुळे प्रशासनास विनंती कि या विहीरीचा गाळ उपसुन नागरीकांची समस्या दुर करावी असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले असुन या निवेदनावर साहेबराव कल्याणकर,राधेशाम महामूने बबलू ठाकुर,मंगेश खंदारे,मणसेचे राज ठाकर, संतोष कदम शिरीश आहेरवाडकर आरुनगुरु खांडवीकर विनोद हेडा आदी नागरीकांच्या सह्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या