🌟ॲड.शर्वरीताई रविकांत तुपकरांनी दिला नुकसानग्रस्तांना धीर......!


🌟ॲड.शर्वरीताई रविकांत तुपकरांनी सिंदखेडराजा व चिखली तालुक्यात केली नुकसानीची पाहणी🌟


सिंदखेडराजा (दि.१३ जुन) :- चक्रीवादळाने सिंदखेडराजा व चिखली तालुक्यात अक्षरश: थैमान घातले आहे. यात अनेकांच्या घरांची पडझड झाली, टिनपत्रे उडाले, अनेकांनी पेरणीसाठी आणुन ठेवलेली खते, बियाणे ओली झाली आहेत. दरम्यान ॲड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी १२ जून रोजी सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात पाहणी केली व नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

               सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील काही गावांमध्य चक्रीवादळाने मोठी हानी केली आहे. अनेकांच्या घरावरील छत उडाले, काहींची घरे पडली, काही ठिकाणी घरांवर झाड, विद्युत खांब कोसळून नुकसान झाले तर अनेकांच्या घरात ठेवलेली खते व बियाणे पावसात भिजून नुकसान झाले आहे. ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी १२ जून रोजी सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. जागदरी, बाळसमुद्र येथेही प्रचंड नुकसान झाले आहे. येथेही ॲड. शर्वरी तुपकर यांनी भेट देवून नुकसानग्रस्तांकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली व पाहणी करत गावकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत विनायक सरनाईक, विलास मुजुमले, समाधान घुबे, प्रमोद घुबे, परमेश्वर घुबे, ऋषी भोपळे, प्रकाश घुबे उपस्थित होते.

       तर या नैसर्गिक संकटामुळे ज्यांची घरे पडली, छत उडाले त्यांच्यासाठी तात्पुरती निवाऱ्याची सोय करावी, झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी केली आहे  .                               

* शर्वरीताई तुपकरांनी साखरे कुटुंबाचे केले सात्वंन :-

चक्रीवादळाचा मोठा तडाखा चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावालाही बसला आहे. येथील अनेकांची घरे पडली, छते उडाली असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. भारत साखरे यांची सहा महिन्यांची चिमुकली झोक्यात झोपली होती. या वादळात टिनपत्रांसह चिमुकली सई देखील झोक्यासोबत उडून गेली. या दुर्दैवी घटनेत या चिुकलीचा मृत्यू झाला. ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी साखरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन करत धीर दिला......

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या