🌟लोकहीतवादी विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रल्हादराव गणपतराव कऱ्हाळे यांच्या सेवा पूर्ती सोहळ्याच्या निमित्त विशेष....!


🌟लोकहीतवादी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून कऱ्हाळे सरांनी सन 1989 यावर्षी पालम तालुक्यातील आईनंवाडी येथून सुरुवात केली🌟


 
सेवेची सुरुवात 28-2-1989 रोजी आईनंवाडी :- ता पालम या लहानश्या खेड्यातून झाली. 4 थी पर्यंत शाळा दोन शिक्षक, एकच वर्ग खोली 65 विध्यार्थी.प्रथम गुणवत्ता वाढवण्यासाठी काम करून भौतिक सुविधा पूर्ण केल्या. त्या काळात पहिली लोकवर्गणी खिडक्या बसवण्यासाठी बोर्ड घेण्यासाठी व कलर देण्यासाठी 700 रुपय झाली तेथून पुढे वर्गवाढ 7 वी पर्यंत शाळा झाली. पुढे मारवाडी :-येथे 4 वर्षानंतर बदली झाली. तिथेही पालक मेळावा घेऊन गुणवत्ता व वर्गवाढ व भौतिक सुविधा, वृक्षारोपण या बाबत जनजागृती करून 33000 हजार रुयातून रंगरगोटी झाली. मा. भस्के माजी सैनिक यांनी 21 हजार रुपये तारेच्या कुंपणासाठी दिले. पुढे गुणवत्तेचा चढता आलेख 3 मुले नवोदय पात्र झाली यात खारीचा वाटा होता हे नक्कीच. यानंतर पदवीधर म्हणून 1999 रोजी प्रा. शा. नाथरा ता. पाथरी :- येथे बद्दली झाली.तिथे 200 झाडाचे वृक्षारोपण, 1 विध्यार्थी नवोदय पात्र,8वी वर्गवाढ असे अनेक उपक्रम घेऊन लोकवार्गणी 80000 हजार जमा करून रंगरंगोटी, मैदान भौतिक सुविधा पूर्ण सहकार्याच्या व गावकरी च्या मदतीने केल्या. बदली होऊ नये म्हणून उपोषणाची नोटीस देणारे प्रेम मिळाले. यानंतर 2003 रोजी वाणी पिंपळगाव ता पालम :-येथे बदली झाली तेथे 5 वी पासून 7 वी वर्ग वाढ संस्थेच्या स्पर्धेत  केली.नवोदय पात्र 1 विध्यार्थी,सुंदर कमान 100 वृक्ष लागवड, तारेचे कुंपण, स्वच्छलंय या साठी गावांनी 130000 ची मदत केली.


2007 रोजी आलेगाव ता पूर्णा :- येथे बदली झाली. तिथेही 100 वृक्षारोपण,रंगरंगोटी, पहिला डिजिटल वर्ग, सुंदर स्टील कमान, 8 वा वर्ग या साठी गावांनी सुमारे 170000 ची वस्तू, नगदी रूपाणी मदत केली.या कामी खारीचा वाटा होता.

हिवरा :- येथे 2013 रोजी अपग्रेड मु. अ. म्हणून नियुक्ती झाली प्रथम गावकरी अपेक्षा जाणून घेतल्या सहकार्या सोबत चर्चा करून गुणवत्ता वाढीसाठी सेमी इंग्रजी वर्ग चालू करणे. नवोदय, शिष्यवृत्ती वर्ग सुरु करून. पालक मेळाव्यात लोकवर्गणी साठी प्रयत्न केले यातून वस्तू नगदी रूपाने 5 वर्षात 450000 लाख रुपये जमा झाले. यात प्रत्येक मुलं दर महिना 10 रुपये जमा करून दरवर्षी 30 हजार मदत केली.यातून 8 वर्ग रणरंगोटी, डिजिटल वर्ग, 120 वर्षारोपण, स्टेज उभारणी, कमान, गेट या बाबीची पूर्तता गाव व सहकारी यांच्या मदतीने केली.गाव करी ते राव न करी हा प्रत्य आला.याच काळात 1 विध्यार्थी नवोदय पात्र झाला. शाळेला दोन वर्ष सलग जिल्हा पुरस्कार मिळाला.


आव्हई :-2018 रोजी बदली सुरुवात 8 सहकारी, संस्थेसी स्पर्धा, tc मागणी यातून सर्वांनी मिळून गुणवत्ता वाढी साठी प्रयत्न केले नंतर पालक मेळावा घेऊन गुणवत्ता व भौतिक सुविधा यासाठी अभ्यासगट चालवणे,लोकवर्गणी जमा करणे या साठी प्रयत्न करून यातून 900000 वस्तू व नगदी रूपाने जमा झाले यातून रंगरंगोटी, स्टेज, कमान, 1000 वृक्षा रोपण, गार्डन, तारेचे कुंपण, ग्रीन शेड, 100 डिजिटल वर्ग,प्रोजेक्टर 3,led 8,शुद्ध पाणी आरोह , वीज सौर ऊर्जा सर्व सुविधा, गुणवत्ता युक्त शाळा तयार झाली. या मुळे मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हातून तिसरा क्रमांक.सलग 3 वर्षे जिल्हा पुरस्कार प्राप्त, pmshri साठी निवड 1कोटी 90 लाख निधी प्रस्तावित .यासाठी सर्व गावकरी, पालक, सर्व शिक्षक, ग्रामपंचायत यांनी अथक प्रयत्न घेतले यामुळेच हेआनंदी वैभव पाहू शकतो.  


  * सेवेची वैशिष्ट्ये :-

1)मुख्यमंत्री सुंदर शाळा जिल्हातून तिसरा क्रमांक आव्हई 

2) 8मुले नवोदय पात्र 

3) 1800 वृक्षारोपण 

4 )17 लाख लोकवर्गणी 

5) 5वेळेस शाळेस जिल्हापुरस्कार 

6) आव्हई pmshri निवड 

7)5 ठिकाणी वर्गवाढ 

8)आदर्श  शिक्षक जिल्हापुरस्कार 

(या कामी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्राम पंचायत गटसाधन केंद्र पूर्णा जिल्हा कार्यालय परभणी.यांचे मोलाचे सहकार्य झाले असल्याचे शिक्षक प्रल्हादराव कराळे नमूद करुन संबंधित अधिकारी/कर्मचारी लोकप्रतिनिधी गावकरी मंडळी यांचे आभार व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या