🌟परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील मानोली शिवारात ढगफुटी : एक महिला गेली वाहून तर एक महिला बचावली....!


🌟पुरात वाहुन गेलेल्या सुनिता लव्हाळे या ४० वर्षीय महिलेचा शोध सुरु🌟 


परभणी (दि.१० जुन २०२४) : परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील मानोली शिवारात आज सोमवार दि.१० जून २०२४ रोजी दुपारी ०४.०० वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटी झाल्याने या ढगफुटीने आलेल्या पुराच्या पाण्यात श्रीमती सुनिता धुरपती लव्हाळे वय ४० वर्ष ही महिला वाहून गेली तर रंजना भास्करराव सुरवसे ही महिला थोडक्यात बचावली.

           दरम्यान, ग्रामस्थांनी पुरात वाहुन गेलेल्या सुनिता लव्हाळे यांचा शोध सुरु केला असून त्या कामी प्रशासनानेही धाव घेतली आहे. तर रंजना सुरवसे यांना बेशुध्द अवस्थेत मानवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

          गेल्या काही तासांपासून या परिसरात ढगाळ वातावरण पसरले होते. पाठोपाठ पावसास प्रारंभ झाला. पावसाने अचानक जोर धरला अन् मुसळधार पावसाने मानोली परिसरास अक्षरशः झोडपून काढले. या प्रकाराने ग्रामस्थ अक्षरशः हादरले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या