🌟पुर्णेतील विद्या प्रसारिणी सभेची प्राथमिक शाळेतील क्रिडा मार्गदर्शक सज्जन जैस्वाल यांना राज्यस्तरीय पुरस्कार....!


🌟ॶर्जुन पुरस्कार प्राप्त पद्मश्री ब्राह्मनंद सगुन कामत शंकवालकरांच्या हस्ते सज्जन जैस्वाल यांना पुरस्कार प्रदान🌟  

पुर्णा (दि.२४ जुन २०२४) :- पु्र्णेतील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या विद्या प्रसारिणी सभेच्या प्राथमिक शाळेतील क्रिडा मार्गदर्शक तथा शिक्षक सज्जन हिरालाल जैस्वाल यांना दि.२३ जुन २०२४ रोजी क्रिडा संस्कृती फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


नाशिक येथील पंचवटीतील आग्रा रोडवरील शुभमंगल कार्यालयात क्रिडा संस्कृती फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ॶर्जुन पुरस्कार प्राप्त पद्मश्री ब्राह्मनंद सगुन कामत शंकवालकर यांच्या हस्ते सज्जन हिरालाल जैस्वाल यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गोरखनाथ बलकवडे तसेच ऑलम्पिक निरीक्षक टोकियो श्री अशोक दुधारे ग्लोबल ह्युमन रिसर्च अँड वेलफेअर सोसा बलवंतसिंह योगशिक्षिका डॉ संतोषी साउळकर क्रीडा शिक्षक सुशिलकुमार देशमुख हे सर्व जण उपस्थित होते .हा पुरस्कार गेल्या सत्तावीस वर्षात केलेल्या सामाजिक कार्य , शैक्षणिक कार्य,व क्रीडा क्षेत्रात  अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू  घडविले या कार्याची दखल घेऊन देण्यात आला. या अगोदर नागपुर येथे राष्ट्रीय पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील लोहा या ठिकाणी क्रीडा राज्य पुरस्कार मिळाला होता व  आता नाशिक येथे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष दत्तात्रय वाघमारे, उपाध्यक्ष भिमरावजी कदम सचिव श्रीनिवासजी काबरा  विजयकुमार रूद्रवार उत्तमराव कदम ,साहेबराव  कदम काकडे साहेब बी. बी. मोरे, मुख्याध्यापक देविदास उमाटे, मुख्याध्यापिका अतिया मॅडम, मुख्याध्यापक एस आर हिंगणे  सर्व शिक्षक गण शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या