🌟मंगरुळपीर शहरात सिंगलयुज प्लाष्टिकवर नगर परिषदेच्या फिरत्या पथकाची कारवाई : हजारोचा माल जप्त....!


🌟सदर मोहिमेमध्ये शहरातील 22 आस्थापणाची तपासणी करण्यात येऊन 7 किलो प्लास्टिक जप्त🌟


फुलचंद भगत

वाशिम:-दि.25/06/2024 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार मा.मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली.सदर मोहिमेमध्ये शहरातील 22 आस्थापणाची तपासणी करण्यात येऊन 7 किलो प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.सदर मोहीम मध्ये नगर परिषद मंगरूळपीर चे आरोग्य निरीक्षक श्री राजेश संगत,शहर समन्वयक श्री अर्जुन मेहरे,सफाई जमादार श्री रमेश शृंगारे,सुरज संगत, संजय शृंगारे,सिद्धार्थ स्थुल व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या