🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील भागेरथाबाई चुडामनी पारवे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन....!


🌟त्यांच्या पश्चात चार मुले,दोन मुली,नातू,पणतू असा परिवार आहे🌟

पुर्णा (दि.०९ जुन २०२४) - पुर्णा तालुक्यातील गौर येथील भागेरथाबाई चुडामनी पारवे यांचे काल शनिवार दि.०८ जुन २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय १०० वर्ष होते त्यांचा स्वभाव बोलका व मायाळू होता त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो.

त्यांच्या पश्चात चार मुले,दोन मुली,नातू,पणतू असा परिवार आहे. त्या निळोबा पारवे यांच्या आई होत त्यांचा अंत्यविधी आज रविवार दि.०९ जुन २०२४ रोजी गौर येथील हिंदू स्मशानभूमीत सकाळी ०९.०० वाजता होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या