🌟परभणी जिल्ह्यातील गायराण धारकांच्या सातबारावरील ‘पोटखराब’ शब्द हटविण्यात यावा......!


🌟भिमशक्ती संघटनेची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे मागणी🌟 


परभणी (दि.19 जुन 2024) : गायरान धारकांच्या सातबारावरील ‘पोटखराब’ हा शब्द हटवून गायरान धारकांबाबत काढलेला आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी भीमशक्ती संघटनेने आज बुधवार दि.19 जुन 2024 रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

              जिल्ह्यातील शेकडो गायरानधारक शेतकर्‍यांना अनेक वर्षांपासून सातबारा मिळालेेला आहे. परंतु, तो सातबारा देतांना त्यावर पोटखराब असा उल्लेख केलेला असल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही. महाराष्ट्र शासनाने 2021 साली गायराधारक शेतकर्‍यांच्या सातबारावरील पोटखराब हा शब्द काढून टाकावा असा शासन निर्णय जाहीर केला होता. परंतु, आजपर्यंत पोटखराब हा उल्लेख सातबारावरुन काढून टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे हा शब्द तात्काळ काढून शेतकर्‍यांच्या पिककर्ज व पिकविमा मिळण्याच्या अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.

             मागील महिन्यात आपण गायरान धारकांना त्यांच्या जमीनी खाली करण्याचा कृती कार्यक्रम जाहीर केला होता. 12 मे 2024 च्या आपल्या पत्रामध्ये आपण मुंबई हायकोर्टाच्या 17 एप्रिल 2024 च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गायरान धारकांना निर्णय लागू केला, परंतु तो आदेश एका विशिष्ठ मालमत्तेबाबत होता. त्यात गायरानधारकांना त्यांच्या जमीनी खाली करा, असा उल्लेख अथवा आदेश नव्हता. त्यामुळे आपण काढलेला चुकीचा आदेश तात्काळ रद्द करावा, गायरान धारकांना न्याय मिळवून द्यावा, आपण काढलेल्या 12 मे 2024च्या पत्राची कोणतीही अंमलबजावणी करु नये व गायरान धारकांच्या सातबारावरील पोटखराब हा शब्द कमी करावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

            निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे नेते प्रविण कनकुटे, मराठवाडा उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, जिल्हाध्यक्ष सतिश भिसे, जिल्हा उपाध्यक्ष अभिनंदन मस्के, पप्पुराज शेळके, शहराध्यक्ष विक्रम काळे, शैलेश वडमारे, युवराज कांबळे, युवराज कांबळे, तातेराव वाकळे, राहुल कनकुटे, संजय वाव्हळे, दिपक कनकुटे, बबन वाव्हळे, यादव पाटील, दशरथ कदम, धम्मपाल पालमकर, अनिल सूर्यवंशी, अ‍ॅड. एम.बी. काळे, भिमराव आवटे, राहुल झोडपे, भिमराव क्षीरसागर, हिरामन सावळे, पांडुरंग धबाले, ज्ञानोबा धबाले, किशोर धबाले, आश्रोबा लांडगे, शंकर कुंभकर्ण, सुभाष कुंभकर्ण व राहुल कनकुटे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या