🌟परभणी जिल्ह्यातील संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेतील निराधारांना १ ऑगस्ट पासून अर्थसहाय थेट खात्यात.....!


🌟असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे🌟

परभणी :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजने अंतर्गत लाभार्थ्यांना १ ऑगस्टपासून अर्थसहा‌याचे वितरण शासन स्तरावरून डि.बी.टी. पोर्टल‌द्वारे करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी कळविले आहे.


राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजने अतंर्गत लाभार्थी यांना अर्थसहाय्य १ ऑगस्ट २०२४ पासून वितरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या स्तरावरुन डि.बी.टी. पोर्टल‌द्वारे करण्यात येणार असल्याने परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक अचूक सादर करावा. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी यांनी आधारकार्ड, बँकेशी संलग्न मोबाईल नंबर, सदर लाभार्थी ह्यात आहे किंवा नाही याबाबत ह्यात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादीबाबतचे आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित गावातील तलाठी किंवा संबंधित तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावीत.

ज्या लाभार्थ्यांनी वरील कागदपत्रे सादर केली नाहीत त्यांचे निवृत्ती वेतन माहे ऑगस्ट २०२४ पासून शासन स्तरावरुन अदा करण्यात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनांचे अर्थसहाय्याचे वितरण थेट लाभार्थ्यांना त़्यांच्या आधार संलग्नीकरण संलग्नीकृत बँक खात्यात (DBT) पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी वरील आवश्यक ती कागदपत्रे संबंधित गावातील तलाठी किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करण्यात यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलेले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या