🌟प्रगतिशील महिला शेतकरी काजल राठोड यांनी शेतीमधील यांञीक कौशल्य प्राप्त करत ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वतः केली उत्तम शेती....!


🌟महिला शेतकरी काजल राठोड यांच्या कष्टाचे सर्वस्तरातून होतेय कौतुक🌟


 
फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातल्या हट्टी येथील प्रगतिशील महिला शेतकरी सौ काजल शाम राठोड यांनी काळाची सुसंगत यांत्रिक कौशल्य स्वतः प्राप्त केले आहे ज्याच्या बळावर वेळप्रसंगी त्या ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची कामे स्वतःच्या शिरशिवारात पार पाडतात.

 प्रगती केवळ स्वतःचीच व्हायला नको तर आपल्या सोबत इतर सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहिला हवेत या उदात्त हेतूने उमेद या संस्थेअंतर्गत स्थानिक पातळीवर सौ.काजल राठोड यांनी दहा बचत गटांची निर्मिती करून शंभर पेक्षा अधिक महिला भगिनींना स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या