🌟परभणीत स्व.सौ.पानकंवरबाई जैन पुण्यतिथी निमित्त आयोजित नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास प्रतिसाद....!


🌟या कार्यक्रमास लॉयन्स क्लबचे ॲड.अशोक सोनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते🌟

परभणी (दि.१२ जुन २०२४) :- परभणीत स्व.सौ.पानकंवरबाई धनराजजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्य आयोजित मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 

 परभणी शहरातील पी.डी.जैन होमीओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे स्व.सौ.पानकंवरबाई धनराजजी जैन यांच्या पुण्यतिथी निमित्य पी.डी.जैन होमीओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच परभणी व लॉयन्स नेत्र रुग्णालय व लॉयन्स क्लब परभणी याच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दि.१२ जुन २०२४ रोजी मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास लॉयन्स क्लबचे ॲड.अशोक सोनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. सौ. पानकंवरबाई धनराजजी जैन यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. या शिबिरात शहरातील ८० रुग्णाची तपासणी करण्यात आली व त्यातील २० रुग्णाना नेत्र शस्त्रक्रियासाठी लॉयन्स नेत्र रुग्णालय येथे बोलाविण्यात आले. कार्यक्रमास लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अॅड. जगदीश मुंदडा, श्री. शंकर गुजराथी, श्री. झेड. आर. मुथा, श्री. निरज पारीख, श्री. सातिश चौधरी, श्री. अनिल मुथा, डॉ. करण मोरे, पी. डी. जैन होमीओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा लॉयन्स क्लबचे सचिव श्री. उदयराज डी. जैन, महाविद्यालयाचे सचिव श्री. अभयराज डी. जैन, प्राचार्य डॉ. विजय दाभाडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ प्रतिभा पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या