🌟पुर्णेतील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप संपन्न...!


🌟समारोप कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन🌟


पुर्णा (दि.८ जुन २०२४) - पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप प्रसिद्ध कवी डॉ. केशव खटींग यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात  आला होता माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दि.०८ जुन २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता समारोप कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

      आयोजित कार्यक्रमास प्रसिद्ध साहित्यिक डॉ. केशव खटींग, जगदीश जोगदंड, ग्रंथालय निरीक्षक बालाजी देवणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर, सचिव जीवन लोखंडे , देवीदास केजगीर, व्यंकटराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. केशव खटींग म्हणाले, शिक्षणाच्या चळवळीतील रांगोळीचा मोठा ठिपका सावित्रीबाई फुले आहेत. त्यांनी किती तरी पाखरांना आभाळ मोकळे केले. सावित्रीच्या लेकीनीं आता मुक्त होऊन कर्तृत्वाचे शिखर गाठावे. ग्रंथ आणि वाचक यांचे दूत होण्याचे काम प्रशिक्षणार्थींनी करावे.

      यावेळी उद्घाटक डॉ. रामेश्वर पवार म्हणाले की, ग्रंथ हे मानवी जीवनातील महत्वाचा घटक आहे. त्याची संगत जीवनाशी घडवून जीवन समृद्ध करा. प्रास्ताविक प्रा. दत्ता पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ अशोक कोलंबीकर यांनी केले. आभार डॉ. विलास काळे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या