🌟पुर्णा तहसीलदार व तहसिल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना लवकरच उपलब्ध होणार नवीन सुसज्ज निवासस्थान....!


🌟आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आज २३ जुन रोजी निवासस्थान बांधकाम भुमिपुजन सोहळा थाटात संपन्न🌟 

पुर्णा (दि.२३ जुन २०२४) - पुर्णा तहसिल कार्यालयात कार्यरत तहसिलदार/नायब तहसिलदार यांच्यासह तहसिल प्रशासनात कार्यरत वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज अशी निवासस्थान उपलब्ध नसल्याने त्यांना सुसज्ज अशी निवासस्थान उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती अखेर त्यांच्या या मागणीचा आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुरावा केल्यामुळे निवासस्थान बांधकामाला मंजुरी मिळाली तब्बल १४ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून होणाऱ्या या निवासस्थानाच्या बांधकामाचा भुमिपुजन सोहळा आज रविवार दि.२३ जुन २०२४ रोजी दुपारच्या सुमारास तहसिल कार्यालयाच्या मागील परिसरात उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर व तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला.

पुर्णा तहसिल कार्यालयाच्या मागील परिसरात तब्बल १४ कोटी रुपयांच्या विकासनिधीतून तहसिलदार/नायब तहसिलदार यांच्यासह तहसिल प्रशासनात कार्यरत वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज अशी विस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येणार आहे या उद्घाटन सोहळ्या वेळी तहसिल कार्यालयात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्यासह आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे तालूकाध्यक्ष गणेश कदम, लक्ष्मीकांत कदम,चांदोजी मामा बोबडे आदींसह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या