🌟पुणे एक्सप्रेससह निजामाबाद डेमू या प्रवासी रेल्वे गाड्या नियमित मार्गाने धावणार.....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने दिली🌟

नांदेड (दि.२९ जुन २०२४) : पुणे एक्सप्रेससह निझामाबाद डेमू या प्रवासी रेल्वे गाड्या नियमित मार्गानेच धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने दिली.

             मध्य रेल्वेने कळविल्यानुसार पुणे विभागातील दौंड ते मनमाड दरम्यान दुहेरी करणाच्या कार्याकरीता पुणतांबा ते कान्हेगाव स्थानकामध्ये नॉन इंटर लॉक आणि इंटर लॉक वर्किंगची कामे सुरु होती परंतु, हा लाईन ब्लॉक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे पुणे एक्सप्रेस आणि निझामाबाद डेमू या रेल्वे गाड्या नियमित मार्गानेच धावणार आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या