🌟परभणी जिल्ह्यातील सेलूत दि.०७ जुन रोजी कविता मिरगाच्या काव्य मैफिल....!


🌟शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम : शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजन🌟

परभणी :- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे संचलित स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.०७ जुन २०२४ रोजी शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता कविता मिरगाच्या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. कविता मिरगाच्या काव्य मैफिलीचे हे अकरावे वर्षे असून या वर्षी काव्य मैफिलीत कवी मुकुंद राजपंखे ( आंबेजोगाई ), संदीप जगताप ( नाशिक ), कल्याण कदम ( परभणी ), भास्कर निर्मळ (छत्रपती संभाजी नगर), मधुरा उमरीकर ( परभणी ), अशोक पाठक ( सेलू ) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत.

 तर कवी संमेलनाचे सुत्रसंचलन महेश अचिंतलवार ( छत्रपती संभाजी नगर ) हे करतील. कवी संमेलन यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांच्या मार्गदर्शनात चंद्रशेखर मुळावेकर, रमेश नखाते, डॉ. सतीश मगर, सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत, एकनाथ जाधव, विलास शिंदे, महादेव आगजाळ, माधव गव्हाणे, पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके परिश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या