🌟परळी नगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी सोडावे....!


🌟वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांची मागणी🌟                        

परळी :- परळी नगरपालिकेने शहराला एक दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले असून नागापूर वान धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे परळी शहराला पाच दिवसाआड ऐवजी एक दिवसाआड पाणी पुरे होईल असा अंदाज असून पावसाळाही सुरू झाला असल्यामुळे पाण्याची परेशानी न होता सर्व शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल त्यासाठी परळी नगरपालिकेने पाच दिवसात पाणी न सोडता एक दिवसावर पाणी सोडावे अशी मागणी ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या