🌟वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषद कार्यालयात नगररचना अधिकारी तात्काळ देण्याची मागणी.....!


🌟नगर परिषदेत नगरचना अधिकारी पद रिक्त असल्यामुळे बांधकाम विभागातील कामकाजावर त्याचा परिणाम🌟

फुलचंद भगत

वाशिम - रिसोड नगर परिषदेत गेल्या तीन-चार वर्षापासून नगरचना अधिकारी पद रिक्त असल्यामुळे येथील बांधकाम विभागातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला असून बांधकाम विभागातील अभियंत्यावर ताण आलेला आहे. नगर रचना अधिकारी पद रिक्त असल्यामुळे शहरातील बांधकाम परवानगी, अभिन्यास परवानगी, विकास योजनेशी निगडीत विविध कामे, सार्वजनिक सुविधांचा विकास, केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणी अंतर्गत विविध प्रकल्पाचा व आरक्षणाचा विकास, नगर रचना योजना, झोन दाखला देणे, अनाधिकृत बांधकाम संबंधीत मार्गदर्शन व कारवाई इत्यादी कामे प्रभावित झाली असून शहराच्या विकासात्मक कामास अडथळा निर्माण झाला आहे. तरी याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांनी सहसंचालक नगर रचना अमरावती यांच्याकडे पाठपुरावा करुन रिसोड नगर परिषदला नगर रचना अधिकारी देण्याची मागणी करावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या