🌟परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर ईद निमित्त सामूहिक प्रार्थना.....!


🌟यावेळी कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या🌟 

परभणी (दि.१७ जुन २०२४) : परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर आज सोमवार दि.१७ जुन २०२४ ईद-उल-अजाह (बकरी ईद) निमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहीक नमाज अदा केली.

             दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बकरी ईद निमित्ताने इदगाह मैदानावर सकाळी ०८.०० वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी सामुहीक नमाज अदा केली यावेळी शाही इमाम मुफ्ती मोहम्मद गौसोद्दीन कासमी साहब यांनी ईद निमित्ताने प्रार्थना देवून दुआ दिली. तसेच सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी जिल्हा पोलिस दलातर्फे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ नेते सय्यद कादर यांच्यासह महानगरपालिकेचे राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या