🌟परभणी जिल्ह्यात संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांचा ०७ जूलै पासून झंझावाती दौरा.....!


 🌟त्यांच्या या दौर्‍या संदर्भात आज सकल मराठा समाजाकडून आयोजित बैठकीत भक्कम असे नियोजन करण्यात आले🌟

परभणी (दि.२४ जुन २०२४) : मराठा आरक्षणासाठी निस्वार्थपणे ऐतिहासिक संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे येत्या ०७ जूलै रोजी परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर दाखल होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोमवार दि.२४ जुन रोजी एका बैठकीद्वारे त्या दौर्‍याचे भक्कम असे नियोजन करण्यात आले.

            पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी लॉन्स या ठिकाणी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाची सोमवारी सकाळी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली. त्यातून 7 जुलै रोजी  मनोज जरांगे पाटील यांच्या परभणी जिल्हा दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर यावेळी त्यांच्या उपस्थित परभणी शहरात संवाद रॅली आणि रोड शोचे आयोजन करण्याचा संकल्प सोडण्यात आला. या दौर्‍यामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांशी संवाद साधणार असून अन्य कार्यक्रमही निश्‍चित करण्यात आले. यामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या